ETV Bharat / business

व्होडाफोनचे शेअर ३४ टक्क्यांनी घसरले; 'हे' आहे घसरणीचे कारण - Mumbai Share Market

सर्वोच्च न्यायलयाने याचिका फेटाळल्याने दूरसंचार कंपन्यांना सुमारे १.४७ लाख कोटी रुपये २३ जानेवारीपर्यंत भरावे लागणार आहेत. मुंबई शेअर बाजारात व्होडाफोन आयडियाचे शेअर ३४ टक्के घसरून प्रति शेअर ३ रुपये झाले आहेत.

Vodafone Idea
व्होडाफोन आयडिया
author img

By

Published : Jan 17, 2020, 12:34 PM IST

मुंबई - व्होडाफोन आयडियाचे शेअर आज ३४ टक्क्यांनी घसरले आहेत. दूरसंचार कंपन्यांनी एजीआरवरील निकालावर पुनर्विचार करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल केली होती. ही याचिका गुरुवारील फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडियाच्या शेअरला फटका बसला आहे.

सर्वोच्च न्यायलयाने याचिका फेटाळल्याने दूरसंचार कंपन्यांना सुमारे १.४७ लाख कोटी रुपये २३ जानेवारीपर्यंत भरावे लागणार आहेत. मुंबई शेअर बाजारात व्होडाफोन आयडियाचे शेअर ३४ टक्के घसरून प्रति शेअर ३ रुपये झाले आहेत. मुंबई शेअर बाजारात भारती एअरटेलचे सुरुवातीला ०.८३ टक्क्यांनी शेअर घसरले. त्यानंतर सावरून पुन्हा वधारले आहेत.

हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे थकित रक्कम भरा; सरकारची दूरसंचार कंपन्यांना नोटीस

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने कंपन्यांच्या आर्थिक ताळेबंदावर तणाव येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर ठेवत आम्हाला निराशा व्यक्त करावी लागेल, असे एअरटेलने म्हटले आहे. दीर्घकाळ वाद चालू राहिल्याने सध्याची एजीआरची व्याख्या तयार झाल्याचेही एअरटेलने म्हटले आहे.

हेही वाचा-'कोणत्याही कंपनीचे कामकाज बंद पडू नये, अशी माझी इच्छा आहे'

काय आहे एजीआर-
सर्वोच्च न्यायालयाने २४ ऑक्टोबरला दूरसंचार कंपन्यांना केंद्रीय दूरसंचार विभागाचे थकित पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. हे थकित पैसे वसूल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना दूरसंचारव्यतिरिक्त मिळणाऱ्या महसुलाचाही विचार केला आहे. हा महसूल अॅडस्टेड ग्रॉस रिव्हन्यू (एजीआर) म्हणून ओळखला जातो.

व्होडाफोन-आयडिया कंपनी ही चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आजवर सर्वात अधिक तोटा झालेली भारतीय कंपनी ठरली आहे. दुसऱ्या तिमाहीत सप्टेंबरअखेर व्होडाफोन-आयडियाला ५० हजार ९२१ कोटींचा तोटा झाला होता.

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.