मुंबई – कोरोना पार्श्वभूमीवर विस्तारा विमान कंपनीने ग्राहकांच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी उपोययोजना जाहीर केल्या आहेत. कंपनीने ग्राहकांचे सर्वेक्षण केल्यानंतर फ्लायरकोड नावाने सुरक्षिततेसाठी उपक्रम सुरू केला आहे.
या सर्वेक्षणातील माहितीनंतर कंपनीने सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना लागू केल्या आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दक्षतेने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आमची टीम ही प्रत्येक ठिकाणी रोज नियमांचे पालन होण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे विस्ताराचे मुख्य वाणिज्य अधिकारी विनोद कान्नान यांनी सांगितले आहे.
असे असले तरी ही एकट्याची लढाई नाही. प्रत्येक ग्राहकाने सहभागी व्हावे आणि प्रयत्न करण्याची गरज आहे. फ्लायर कोड हे केवळ काही सोपी पावले आणि काही बाबींचा विचार आहे. मात्र, त्याचा विमान प्रवास सुरक्षित होण्यावर मोठा परिणाम होणार असल्याचे कंपनीच्या या अधिकाऱ्याने सांगितले.पूर्ण प्रवास तुम्ही फेसमास्क घातला आहे, याची खात्री करा. मास्क काढल्याने अवतीभोवती असलेल्या इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होवू शकतो. कोणत्याही पृष्ठभागाशी अथवा व्यक्तीशी गरज नसतान तुम्ही संपर्कात येत तर नाही, याची खात्री करा. कुठेही अवतीभोवती स्पर्श केला तर हात सॅनिटायजरने स्वच्छ करा, असे त्यांनी सांगितले. फ्लायरकोडमधून ग्राहकांच्या पूर्वी प्रवासाची माहितीही कंपनी घेत आहे. त्याममधून ग्राहकाने विलगीकरणाचे नियमांचे पालन केले आहे, हे कंपनीकडून तपासले जाते.