नवी दिल्ली - कोरोना लस ही संसर्ग थांबू शकत नाही. मात्र, लस ही कोरोनाची लक्षणे सौम्य करते, असे मत अपोलो हॉस्पिटल्सच्या संयुक्त व्यस्थापकीय संचालिका संगीता रेड्डी यांनी व्यक्त केले. कोरोनावरील संसर्गावर उपचार घेऊन रुग्णालयातून घरी जात असताना त्यांनी ट्विट केले आहे.
अपोलो हॉस्पिटल्सच्या संयुक्त व्यस्थापकीय संचालिका संगीता रेड्डी यांनी कोरोनाबाबतचे अनुभव ट्विटरवरून शेअर केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की गेली ५०० दिवस कोरोनाला टाळल्यानंतर १० जूनला कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुरुवातीला मला खूप धक्का बसला. मी का? असा प्रश्न निर्माण झाला. मी काळजी घेतली होती व लसही घेतली होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मला खूप ताप होता. मी कॉकटेल थेरपी घेतली. त्यामुळे खूप मोठा नाट्यमय बदल झाला.
हेही वाचा-कच्च्या मालाच्या पुरवठ्याकरिता सरकारने हस्तक्षेप करावा-ऑक्सिजन कंपनीची मागणी
कोरोनाचे निदान आणि उपचाराकिरता लशीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कोरोना लशीमुळे वेळेवर निदान आणि लवकर बरे होता येते. मी आज घरी जात आहे. घरीच विलगीकरणात राहत आहे. मी परिचारिका, डॉक्टर आणि वैज्ञानिक डॉट कॉमचे आभार मानते.
हेही वाचा-अदानींचे एका दिवसात 55 हजार कोटींचे नुकसान, असा बसला फटका
देशामध्ये सरकारने लसीकरण मोहिम वेगाने सुरू करावी, अशी रेड्डी यांनी अपेक्षा केली आहे. सरकारने देशात लशीचे उत्पादन आणि विदेशातून लशीची खरेदी करावी, असे रेड्डी यांनी म्हटले आहे. लसीकरणासाठी सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयाच्या नेटवर्कची मदत घ्यावी, असेही संगीता रेड्डी यांनी म्हटले आहे.