ETV Bharat / business

अमेरिका-चीन व्यापारी युद्धाची आयफोनलाही झळ, ३ टक्क्याने वाढणार किंमत

author img

By

Published : May 15, 2019, 3:44 PM IST

Updated : May 15, 2019, 7:04 PM IST

चीनमधील उत्पादित केलेल्या बॅटरी आणि इतर घटकांचा उत्पादन खर्च हा २ ते ३ टक्क्याने वाढेल, असे डॅन एल्वस या विश्लेषकाने म्हटले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी आयफोनकडून किंमती वाढविल्या जाण्याची शक्यता आहे.

आयफोन, सौजन्य -अॅपल वेबसाईट

सॅन फ्रान्सिस्को - अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध आणखी भडकले आहे. अशा स्थितीत आयफोनच्या किंमती ३ टक्क्याने वाढण्याची शक्यता असल्याने त्याचा ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे.

चीनमधील उत्पादित केलेल्या बॅटरी आणि इतर घटकांचा उत्पादन खर्च हा २ ते ३ टक्क्याने वाढेल, असे डॅन एल्वस या विश्लेषकाने म्हटले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी आयफोनकडून किंमती वाढविल्या जाण्याची शक्यता आहे.यामुळे आयफोन एक्स एसची किंमत ही ९९९ डॉलरवरून १ हजार २९ डॉलर होईल, असे त्यांनी म्हटले आहे. जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चीनच्या उत्पादित मालांवरील आयात शुल्कात वाढ केली तर आणखी आयफोनच्या किंमती वाढू शकतात. याचा परिणाम म्हणून आयफोनच्या किंमतीत १२० डॉलरने वाढ होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

व्यापारी युद्धाच्या वणव्यात नव्याने पडली ठिणगी -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १० मे रोजी २० हजार डॉलर एवढ्या मुल्याच्या चीनच्या उत्पादित वस्तुंवरील आयात शुल्कात वाढ केली. त्यानंतर चीन-अमेरिका या दोन महाशक्तीमधील व्यापारी युद्धाच्या वणव्यात नव्याने ठिणगी पडली आहे. या परिस्थितीमुळे आशियातील शेअर बाजाराला गेली काही दिवस फटका बसला. तसेच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सलग नऊ सत्रात घसरला होता.

Intro:Body:

biz

Conclusion:
Last Updated : May 15, 2019, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.