ETV Bharat / business

पोलिसांकडून धमकाविण्याकरता वापरण्यात येणारी रणनीती चिंताजनक - ट्विटर - twitter statement over employees safety

पारदर्शकतेच्या तत्वानुसार आम्ही कठोरपणे नियमांचे पालन करणे सुरुच ठेवणार आहोत. प्रत्येक आवाजाचे सक्षमीकरण, अभियव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि कायद्याप्रमाणे गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी बांधील असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

twitter
ट्विटर
author img

By

Published : May 27, 2021, 5:42 PM IST

नवी दिल्ली- भाजपच्या प्रवक्त्यांचे ट्विट मॅनिप्युलेटेड टॅग केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईवर ट्विटरने प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांकडून धमकाविण्याकरता वापरण्यात येणारी रणनीती चिंताजनक असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. भारतामधील ट्विटरचे कर्मचारी असल्याचे सांगत ट्विटरने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका होण्याची भीतीही व्यक्त केली आहे.

सरकारने लागू असलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी कंपनी मोठी मेहनत घेत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नियम हे अडथळा विरहीत, मुक्त जनसंवाद करावेत, अशी अपेक्षा ट्विटरने व्यक्त केली आहे.

हेही वाचा-'नव्या सोशल मीडियाच्या नियमाबाबत व्हॉट्सअपच्या वापरकर्त्यांनी घाबरण्यासारखे काही नाही'

पारदर्शकतेच्या तत्वानुसार आम्ही कठोरपणे नियमांचे पालन करणार-

सध्या, आम्ही भारतामधील आमच्या कर्मचाऱ्यांबाबत नुकतेच घडलेल्या घटनांनी चिंतेत आहोत. लोकांना सेवा देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका होण्याची भीती आहे. आमच्याबरोबरच भारत व जगामधील नागरी समुदाय हा पोलिसांकडून धमकाविण्याकरता वापरण्यात येणारी रणनीतीबाबत चिंतेत आहे. पारदर्शकतेच्या तत्वानुसार आम्ही कठोरपणे नियमांचे पालन करणे सुरुच ठेवणार आहोत. प्रत्येक आवाजाचे सक्षमीकरण, अभियव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि कायद्याप्रमाणे गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी बांधील असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

हेही वाचा- चलनी नोटा छापण्याची वेळ आली - उदय कोटक यांचा केंद्राला सल्ला

मॅनिप्युलेटेड मीडियात टॅग केल्याने दिल्ली पोलिसांची नोटीस

दिल्ली पोलिसाच्या विशेष सेलने सोमवारी ट्विटर इंडियाला कोव्हिड टूलकीटच्या तपासाबाबत नोटीस पाठविली आहे. कोणत्या माहितीवरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचे ट्विट मॅनिप्युलेटेड मीडियात टॅग केले आहे, अशी दिल्ली पोलिसांनी नोटीसमध्ये विचारले आहे. दिल्ली पोलिसांचे पथक दिल्लीमधील लाडो सराई व गुरुग्राम येथील ट्विटर कार्यालयात धडकले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.