बीजिंग – अमेरिकेने बंदी घालण्याची धमकी दिल्यानंतर टिकटॉकने पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी फेसबुक कंपनीवर निशाणा साधला आहे. टिकटॉकची फेसबुककडून नक्कल केली जात असल्याचे टिकटॉकने म्हटले आहे. फेसबुकच्या नक्कलविरोधात लढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
बाईटडान्सच्या मालकीची टिकटॉक कंपनी आहे. कंपनी जागतिक होत असताना टिकटॉकला अत्यंत गुंतागुंतीच्या अकल्पित समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे बाईटडान्सने म्हटले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकीय वातावरण, विविध संस्कृतींमध्ये असलेला वाद आणि फेसबुकसारख्या नक्कल करणाऱ्या प्रतिस्पर्धी कंपन्या यांचा समावेश असल्याचे बाईटडान्सने म्हटले आहे.
जागतिककरणाच्या दृष्टीकोनातून स्थानिक नियमांचे, कायदेशी अधिकारांचे कठोरपणे पालन करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
फेसबुकने टिकटॉकप्रमाणे तयार करण्यात आलेल्या लॅस्सू अॅप तयार केले आहे. मात्र, त्या अॅपला फारसे यश मिळाले आहे. त्यानंतर रिल्स हे अॅपही टिकटॉकची नक्कल असल्याचा आरोप टिकटॉकच्या सीईओंनी नुकतेच केला आहे. अमेरिकेत टिकटॉकचे 80 दशलक्ष वापरकर्ते आहे. त्यामध्ये अनेक वापरकर्ते हे टिकटॉकचा वापर करून समाज माध्यमात करियर करत आहे. त्यामधून उत्पन्न मिळवित आहेत.
टिकटॉकचे सीईओ केवीन मेयर म्हणाले, की आम्ही राजकीय नाही. आम्ही राजकीय जाहिराती स्वीकारत नाही. तसेच राजकीय मोहीम चालवित नाहीत. प्रत्येकाने आनंदी राहावे, यासाठी आमचे शक्तिशाली आणि उत्साही माध्यम आहे. टिकटॉकशिवाय अमेरिकन जाहिरातदारांपुढे कमी पर्याय असणार आहेत. स्पर्धा कमी झाल्याने अमेरिकेची नवनिर्मितीची उर्जा कमी होणार असल्याचे मेयर यांनी म्हटले.