नवी दिल्ली - कोरोनाच्या काळात वेतनवाढीची प्रतिक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टीसीएसने खूश केले आहे. टाटा कन्सलन्टसी सर्व्हिसेसने (टीसीएस) वर्ष २०२१-२२ साठी कर्मचाऱ्यांकरता वेतनवाढ जाहीर केली आहे. या वेतनावाढीचा कंपनीमधील सुमारे ४.७ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
टीसीएसने कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे साधारणत: ६ ते ७ टक्के वेतनवाढ केल्याचे सूत्राने सांगितले. गेल्या सहा महिन्यात कंपनीने दुसऱ्यांदा वेतनवाढ दिली आहे. वेतनवाढ होणार असल्याच्या वृत्ताला टीसीएसच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात १६८ रुपयांची वाढ; चांदीत १३५ रुपयांची घसरण
एप्रिल २०२१ पासून सर्व कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात येणार असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. आमच्या सहकाऱ्यांनी कठीण काठात अत्यंत नवसंशोधनात्मक दृष्टीकोन, स्वीकारार्हता आणि बळकटपणा दाखविल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
हेही वाचा-कोव्हिड-१९ लसचा इंग्लंडला आणखी पुरवठा करण्याचा नंतर प्रयत्न करू-सीरम
- वेतनवाढीनंतर कंपनीची वर्षभरातील एकूण १२ ते १४ टक्के वेतनवाढ होणार आहे.
- गतवर्षी ऑक्टोबरपासून वेतनवाढ जाहीर करणारी टीसीएस ही पहिली सॉफ्टवेअर कंपनी आहे.
- मुंबईमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या टीसीएसने कोरोनाच्या काळात अनिश्चितता असातनाही वेतनवाढ दिली होती.
- एवढेच नव्हे तर नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांना कंपनीकडून बढतीही देण्यात आली आहे.
- टीसीएसची वेतनवाढीची घोषणा म्हणजे नोकऱ्यांमधील स्थिती पूर्ववत असल्याचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.