ETV Bharat / business

कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सुरक्षित; वेतनवाढीला यंदा स्थगिती - टीसीएस - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

टाटा ग्रुपने सुमारे ४० हजार जणांना नोकऱ्यांची ऑफर दिली आहे. या प्रत्येकाचा आदर राखत त्यांना नोकरीत घेतले जाणार असल्याचे टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांनी म्हटले आहे.

टीसीएस
टीसीएस
author img

By

Published : Apr 17, 2020, 3:38 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटात अनेक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमाविण्याची भीती आहे. अशा स्थितीत सॉफ्टवेअरची निर्यात करणारी कंपनी टीसीएसने ४.५ लाख कर्मचाऱ्यांपैकी कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करणार नसल्याचे म्हटले. मात्र, चालू वर्षात कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात येणार नसल्याचेही कंपनीने सांगितले.

टाटा ग्रुपने सुमारे ४० हजार जणांना नोकऱ्यांची ऑफर दिली आहे. या प्रत्येकाचा आदर राखत त्यांना नोकरीत घेतले जाणार असल्याचे टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे काही ब्ल्यू चिप कंपन्यांनी नोकरीची ऑफर दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यावर फेरविचार करणार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोनाचे संकट : जगभरातील १०० हून अधिक देशांनी आयएमएफकडे मागितली मदत

कंपनीने मार्चच्या तिमाहीत चांगला नफा मिळविला आहे. असे असले तरी पहिल्या दोन तिमाहीत कोरोनामुळे कठीण काळ असल्याचे टाटा ग्रुपने संकेत दिले आहेत. टाटा ग्रुपचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर एन. गणपती सुब्रमण्यन यांनी सांगितले, की देशामधील कंपनीत सुमारे ३.५५ लाख कर्मचारी आहेत. त्यापैकी ९० कर्मचारी हे ग्राहकांना सेवा देण्यासाठी सुरक्षित ठिकाणावरून काम करत आहेत.

हेही वाचा-कोरोनाशी लढा : एल अँड टी देणार सरकारला ४० कोटींची वैद्यकीय साधने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.