नवी दिल्ली - सुझुकी मोटारसायकल इंडिया प्रा. लि. (एसएमआयपीएल) कंपनीने आज बीएस-६ इंजिन क्षमतेची बर्गमॅन स्ट्रीट स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची ७७,९०० रुपये (दिल्ली एक्सशोरुम) आहे.
नवीन बर्गमॅन स्ट्रीटमध्ये फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. स्कूटरमधून कार्बनचे कमी उत्सर्जन होत असताना दुचाकीचा चालविण्याचा चांगला अनुभव येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-साखर कारखान्यांसाठी 'सुगीचा हंगाम', चढे दर असताना निर्यातीची संधी
एसएमआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक कोईशिरो हिराओ म्हणाले, १२५ सीसीच्या स्कूटर श्रेणीत कंपनीची स्कूटर अग्रगण्य राहिली आहे. बर्गमॅन स्ट्रीट मॉडेलने नवीन यशस्वी अशी श्रेणी तयार केली आहे. बीएस-६ इंजिन क्षमता असलेले अद्ययावत केलेली बर्गमॅन स्ट्रीट ग्राहकांना पूर्णपणे चांगला अनुभव देईल, असा विश्वास आहे. फोर स्ट्रोकचे अॅल्युमिनिअमपासून बनविलेले १२४ सीसीचे इंजिन आहे. दुचाकीस्वाराला बसण्यासाठी लांब सीट आणि पाय ठेवण्यासाठी चांगली सुविधा आहे. मोबाईल चार्जिंगसाठी खास सॉकेट व मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी कंपनीने सुविधा दिलेली आहे.