नवी दिल्ली - भारती एअरटेलचे चेअरमन सुनिल मित्तल यांनी गुरुवारी केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांची भेट घेतली. एजीरच्या थकित शुल्काने दूरसंचार क्षेत्र संकटात आहे. अशा स्थितीत कर आणि शुल्क कमी करावे, अशी मित्तल यांनी दूरसंचार मंत्र्यांकडे विनंती केली.
एजीआरच्या थकित शुल्काबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पालन करण्यासाठी एअरटेल बांधिल असल्याचे सुनिल मित्तल यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, कंपनी उर्वरित रक्कम लवकरच देणार आहे.
हेही वाचा-एलआयसी शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यासाठी मंत्रालयीन समितीची स्थापना
उद्योगावर प्रचंड कर आकारण्यात येत आहे. दूरसंचार क्षेत्रासाठी कर आणि शुल्कात कपात करावे, असे त्यांनी सुचविले आहे. एअरटेलला १७ मार्चपर्यंत पैसे देण्यासाठी वेळ आहे. त्यापूर्वीच कंपनी पैसे देईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-अमेरिकेसोबत करार करण्यास आम्हाला घाई नाही - परराष्ट्र व्यवहार मंत्रालय