ETV Bharat / business

स्पाईसजेट 'या' कर्मचाऱ्यांना देणार विनावेतन सुट्टी - Lockdown in Maharashtra

स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांना एप्रिलमधील पगार हा काम केलेल्या दिवसांएवढाच मिळणार असल्याचे सूत्राने सांगितले

स्पाईसजेट
स्पाईसजेट
author img

By

Published : Apr 19, 2020, 7:20 PM IST

मुंबई - टाळेबंदीत विमान सेवा रद्द झालेल्या स्पाईसजेट कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने ५० हजार रुपयांहून अधिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना रोटेशनलप्रमाणे विनावेतन सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ विमानसेवा बंद असतानाच्या काळातील वेतन कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.

स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांना एप्रिलमधील पगार हा काम केलेल्या दिवसांएवढाच मिळणार असल्याचे सूत्राने सांगितले. गो-एअरनेही सुमारे ५ हजार ५०० कर्मचाऱ्यांना २५ मार्च ते ३१ दरम्यान विनावेतन सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-टाळेबंदी-२ : उद्यापासून कोणत्या कामांना देण्यात येणार आहे परवानगी?, घ्या जाणून

टाळेबंदीदरम्यान विमान सेवा बंद असल्याने इतर विमान कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना विनावेतन सुट्टी देणार असल्याचे कळविले आहे. देशात टाळेबंदी २५ मार्च ते ३ मेपर्यंत जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा-कोरोनाशी लढा; केंद्र सरकारकडून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारे पोर्टल लाँच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.