नवी दिल्ली - ज्या ग्राहकांना आरोग्य विमा योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना मासिक हप्त्याचीही सोय मिळणार आहे. याबाबत विमा नियामक संस्था आयआरडीएने कंपन्यांना निर्देश काढले आहेत. सध्या ग्राहकांना आरोग्य विमा योजनेसाठी वर्षभरासाठी एकदाच हप्ता भरावा लागत आहे.
ग्राहकांना मासिक हप्त्याची सोय उपलब्ध करून देताना मूळ विमा योजनेच्या हप्त्यात बदल करता येणार नसल्याचे आयआरडीएने म्हटले आहे. विमा हप्ता हा मासिक, त्रैमासिक किंवा सहा महिन्यासाठी असावा. आयआरडीएने अधिसूचना काढून विमा हप्त्याच्या संचरनेत बदल करण्याची विमा कंपन्यांना परवानगी दिली आहे.
हेही वाचा-जागतिक प्रतिष्ठित कंपन्यांच्या यादीत इन्फोसिस तिसऱ्या क्रमांकावर, इतर १६ कंपन्यांचाही समावेश
भारतीय विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) विमा कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी अधिक लवचिकता दिली आहे. त्यातून कंपन्यांना जास्तीत जास्त विस्तार करणे शक्य होणार आहेत. तसेच ग्राहकांना आरोग्य विमा घेणे सुलभ होणार आहे.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकात ३०० अंशाची पडझड; बँकिंगसह आयटी कंपन्यांचे घसरले शेअर