नवी दिल्ली - जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑनलाईन बँकिंग सेवा या १७ जानेवारीला दोन तासांसाठी बंद राहणार आहेत. ही माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरवर बुधवारी दिली आहे.
स्टेट बँकेची इंटरनेट बँकिंग, योनो मोबाईल अॅप आणि युपीआय सेवा ही ग्राहकांना दुपारी साडेबारा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद राहणार आहे. बँकेकडून देखभाल व दुरुस्तीसाठी काम सुरू असणार आहे. त्यामुळे स्टेट बँकेच्या योनो, योनो लाईट आणि युपीआय या डिजीटल सेवा बंद राहणार असल्याचे स्टेट बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात घसरण; चांदी प्रति किलो 340 रुपयांनी महाग
आर्थिक व्यवहारात मोबाईल बँकिंगचा ५५ टक्के हिस्सा
स्टेट बँक योनोचे २.६ कोटी वापरकर्ते आहेत. तर दररोज योनोचे ५.५ दशलक्ष वापरकर्ते लॉग इन करतात. तर दररोज सुमारे ४ हजार जणांना वैयक्तिक कर्ज दिले जाते. तर दररोज १६ हजार कृषी अॅग्री गोल्ड कर्ज दिले जाते. बँकेच्या ग्राहकांचे एकूण ५५ टक्के आर्थिक व्यवहार हे मोबाईलवरून होतात.
हेही वाचा-COVAXIN च्या निर्मितीत गोवंशाच्या सीरमचा वापर नाही- आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण