ETV Bharat / business

रिलायन्सचा विक्रम ; ९ लाख कोटींचे भांडवली मूल्य असलेली देशातील ठरली पहिली कंपनी - market capitalisation

शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर २.२८ टक्क्यांनी वधारून १ हजार ४२८ रुपये अशा विक्रमी दरावर पोहोचले.

मुकेश अंबानी
author img

By

Published : Oct 18, 2019, 6:27 PM IST

नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीजने आज उद्योगविश्वात नवा इतिहास रचला आहे. रिलायन्स ही ९ लाख कोटी भांडवली मूल्य असलेली पहिली कंपनी ठरली आहे.

मुंबई शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात रिलायन्सचे भांडवली मूल्य ९ लाख १ हजार ४९०.०९ कोटी रुपये असल्याचे दिसून आले. शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर २.२८ टक्क्यांनी वधारून १ हजार ४२८ रुपये अशा विक्रमी दरावर पोहोचले.

हेही वाचा-देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी स्वत:चे वेतन केले कमी, रक्कम ऐकून व्हाल थक्क

रिलायन्स ही ऑगस्ट २०१८ मध्ये ८ लाख कोटी रुपयांचे भांडवली मूल्य असेली देशातील पहिली कंपनी ठरली होती. शेअर बाजारातील कंपनीचे शेअरच्या चढ-उतारावरून कंपनीचे भांडवली मूल्य सतत बदलत असते.

हेही वाचा-रिलायन्स जिओ ब्रॉडब्रँड कनेक्शनवर देणार मोफत सेट टॉप बॉक्स ?

दरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेली मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आहेत. रिलायन्सनंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही दुसऱ्या क्रमांकाची भांडवली मूल्य असलेली कंपनी आहे. टीसीएसचे सुमारे ७ लाख ७१ हजार ९९६.८७ कोटी रुपये भांडवली मूल्य आहे.

Intro:Body:

Dummy -Business Desk

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.