ETV Bharat / business

Reliance AGM 2020 : जाणून घ्या रिलायन्सने केलेल्या महत्त्वाच्या घोषणा - mumkesh ambani latest news

रिलायन्स इंडस्ट्रीज चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओमध्ये गुगल कंपनी गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. तसेच गुगल आणि जिओ या दोन्ही कंपन्या स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

mumkesh ambani
मुकेश अंबानी
author img

By

Published : Jul 15, 2020, 6:40 PM IST

Updated : Jul 15, 2020, 7:13 PM IST

हैदराबाद - रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यामध्ये जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स किरकोळ विक्री आणि आणि ऑईल ते केमिकल या व्यवसायामधील घोषणांचा समावेश आहे

रिलायन्स इंडस्ट्रीज चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओमध्ये गुगल कंपनी गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले...

  • गुगल आणि जिओ या दोन्ही कंपन्या स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार असल्याची त्यांनी माहिती दिली. या ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर 4जी आणि 5जी तंत्रज्ञान असलेल्या मोबाईलमध्ये होणार आहे. या भागीदारीतून भारत 2जी मुक्त होणार असल्याचे अंबानी यांनी यावेळी म्हटले.
  • स्वदेशी 5जी तंत्रज्ञान विकसित केल्याची महत्त्वाची घोषणा मुकेश अंबानी या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
  • मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश यांनी जिओ टीव्ही प्लस डेमो यावेळी दाखवला. त्याचा वापर ॲमेझॉन, हॉटस्टार अशा व्हिडीओ ॲप साठी करता येणार आहे
  • ऑनलाईन वार्षिक सभेसाठी जिओ मीटचा वापर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात 50 लाख जिओ डाऊनलोड झाल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली
  • स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी जिओ ग्लासचे लॉंचिंग करण्यात आले.
  • जिओ मीटचा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कसा वापर होऊ शकतो, याची माहिती ईशा अंबानी यांनी यावेळी दिली.
  • जिओ हेल्थ प्लेटफार्ममधून लोकांना ऑनलाइन कन्सल्टेशन करता येणार आहे. तसेच आरोग्य विषयाची माहिती ऑनलाइन संग्रहित करता येईल. असे ईशा यांनी सांगितले
  • जिओ मार्ट हे देशातील विविध शहरांमध्ये सुरू झाले आहे. त्यामधून दररोज अडीच लाख ऑर्डर पुरविल्या जात असल्याची त्यांनी माहिती सांगितली.

हेही वाचा - 'आपण जागतिक पातळीवरील सन्मान गमावत चाललो आहोत'

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी व्हिडीओ संदेशात सांगितले की लघुउद्योग हे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचा मूलभूत गाव आहे देशाच्या व्यापारी क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील अशा महत्त्वाच्या प्रकल्पावर आम्ही एकत्रित काम करत आहोत.

  • रिलायन्स रिटेल चा गेल्या पाच वर्षात आठ पटीने व्यवसाय वाढल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.
  • रिलायन्स 15 वर्षांत व्हिजनने जगातील नवी ऊर्जा व नवीन उत्पादनात आघाडी मिळवेल असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.
  • रिलायन्सची मालकी असलेल्या नेटवर्क 18मध्ये डेन नेटवर्क आणि हॅथवे केबलचे विलीनीकरण करण्यात आले.

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बोलताना रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरमन आणि संस्थापक नीता अंबानी म्हणाल्या, की कोरोनाच्या महामारीवर लवकरच लस उपलब्ध होईल याची खात्री आहे. ही लस डिजिटल पायाभूत सुविधा आणि पुरवठा साखळीचा उपयोग करून देशाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Last Updated : Jul 15, 2020, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.