नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रानंतर रिलायन्स डीटीएच क्षेत्रात जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. याचाच भाग म्हणून रिलायन्स ग्राहकांना प्रत्येक ब्रॉडबँड कनेक्शनसोबत मोफत सेट टॉप बॉक्स देण्याची शक्यता आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे ऑप्टिकल फायबरवर आधारित असलेल्या जिओफायबर ब्रॉडबँडचे ५ सप्टेंबरला लाँचिग करणार आहेत. सूत्राच्या माहितीनुसार सर्व जीओफायबर ग्राहकांना मोफत सेट टॉप बॉक्स दिला जाणार आहे.
हेही वाचा-जीडीपी ५ टक्के ही सरकारची जागे होण्याची वेळ - किरण मुझुमदार शॉ
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी जीओफायबर ग्राहकांना लँडलाईनवरून मोफत कॉलिंग देणार असल्याची घोषणा केली. तर १०० एमबीपीएस ते १ गिगाबीट प्रति सेकंद वेगाचे इंटरनेट कनेक्शन आहे यामध्ये मासिक शुल्क हे ७०० रुपये द्यावे लागतात. तर वार्षिक प्लॅन घेणाऱ्याला मोफत एचडी टीव्ही सेट दिला जात आहे.
हेही वाचा-जिओ गिगा फायबरवर एअरटेलची कडी; ऑनलाईन मनोरंजन सेवा देणारी 'एक्सस्ट्रीम' लाँच
सूत्राच्या माहितीनुसार जीओफायबर ग्राहकांना सिनेमा, व्हिडिओ आणि इंटरनेटमेंट मोबाईल अॅपचा लाभ घेता येणार आहे. ही सेवा ब्राँडबँड कनेक्शनसोबत देणार असताना त्यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येणार नाही. सेट टॉप ऑफ बॉक्समध्ये टीव्ही सेटच्या माध्यमामधून व्हिडिओ कॉलिंग सेवा असणार आहे. त्यासाठी ग्राहकांना कॅमेरा हा एसटीबीला जोडावा लागणार आहे.
हेही वाचा- भारतीय कंपन्यांवरील कर्जाचा बोझा जुलैमध्ये गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट
सूत्राच्या माहितीनुसार भारती एअरटेलवर उपलब्ध असलेला कंटेन्टही जिओफायबरवर उपलब्ध असणार आहे. जीओने हॉटस्टारसह विविध मनोरंजन अॅपबरोबर करार केला आहे.