ETV Bharat / business

केंद्र सरकारच्या आदेशाला हरताळ; विमान कंपन्यांकडून तिकीट बुकिंग सुरू

कंपन्यांच्या वेबसाईटच्या माहितीवरून स्पाईसजेट आणि गोएअरने १६ मेपासून तिकिट बुकिंग सुरू केले आहे. तर इंडिगो आणि विस्ताराने १ जूनपासून तिकिट बुकिंग सुरू केले आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने सर्व विमान कंपन्यांना तिकिट बुकिंग थांबविण्याचे १९ एप्रिलला आदेश दिले होते.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Apr 26, 2020, 7:18 PM IST

नवी दिल्ली - सरकारच्या आदेशाशिवाय तिकिट बुकिंग करू नये, या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या आदेशाला विमान कंपन्यांनी हरताळ फासला आहे. स्पाईसजेट, गोएअर, विस्तारा आणि इंडिगोने तिकिट बुकिंगला सुरुवात केली आहे. टाळेबंदी ३ मेनंतर सुरू राहणार की नाही, याबाबत अनिश्चितता असतानाच विमान कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे.

कंपन्यांच्या वेबसाईटच्या माहितीवरून स्पाईसजेट आणि गोएअरने १६ मेपासून तिकिट बुकिंग सुरू केले आहे. तर इंडिगो आणि विस्ताराने १ जूनपासून तिकिट बुकिंग सुरू केले आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने सर्व विमान कंपन्यांना तिकिट बुकिंग थांबविण्याचे १९ एप्रिलला आदेश दिले होते.

हेही वाचा-कोरोना लढा : अतिश्रीमंतावर ४० टक्के कर लागू करा, महसूल अधिकाऱ्यांची सरकारला शिफारस

ईटीव्ही भारतशी बोलताना विस्ताराचे प्रवक्ते म्हणाले, आम्ही १ जूनपासून तिकिट बुकिंग करत आहोत. त्याविषयी अधिक प्रतिक्रिया देवू शकत नाही. नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि इंडिगोच्या प्रवक्त्याची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की आम्ही जर तिकिट बुकिंग केले नाही तर डिसेंबर आणि नंतरही तिकिट बुकिंग करू शकत नाही. त्यामुळे कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा-अक्षय्य तृतीया : ऑनलाईन सोने खरेदीला चांगला प्रतिसाद; नाणे खरेदीकडे ग्राहकांचा ओढा

जीएमआर कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख तुषार मक्कर म्हणाले, तिकिट बुकिंग सुरू करण्याच निर्णय हा विमान कंपन्यांनी घेतला आहे. विमानतळाविषयी सांगायचे झाले तर आम्ही तयार आहोत. केवळ नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या निर्देशाची वाट पाहत आहोत. जेव्हा संचालनालयाचे निर्देश येतील, तेव्हा काम सुरू होईल. टाळेबंदी संपण्यावर हा निर्णय अवलबूंन असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.