ETV Bharat / business

पेटीएमला मागील आर्थिक वर्षात सरासरी रोज ४.६५ कोटींचा तोटा! - पेटीएम तोटा

सलग दुसऱ्या वर्षी पेटीएमच्या तोट्यात घसरण झालेली दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनीला मिळणाऱ्या महसुलाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी होऊन ३,१८६ कोटी रुपये आहे. तर आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कंपीला ३५४०.७७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

पेटीएम
पेटीएम
author img

By

Published : Jun 5, 2021, 4:39 PM IST

नवी दिल्ली - डिजीटल देयक व्यवहार कंपनी पेटीएमला मागील आर्थिक वर्षात एकूण १,७०४ कोटी रुपयांचा तोटा झाला. याचा अर्थ मागील आर्थिक वर्षात पेटीएमला सरासरी दररोज ४.६५ कोटी रुपयांचा तोटा झाला. असे असले तरी पेटीएमला झालेला आर्थिक तोटा आर्थिक वर्ष २०१९-२० च्या तुलनेने १,२४० कोटी रुपयांनी कमी आहे.

सलग दुसऱ्या वर्षी पेटीएमच्या तोट्यात घसरण झालेली दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनीला मिळणाऱ्या महसुलाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी होऊन ३,१८६ कोटी रुपये आहे. तर आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कंपीला ३५४०.७७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

हेही वाचा-महामारीतही स्टार्टअपची चमकदार कामगिरी; १.१७ लाख रोजगाराची निर्मिती

दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्था सुधारल्याने महसुलात वाढ

पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले, की पहिल्या आर्थिक सहामाहीत कोरोना महामारीमुळे व्यापारी भागीदारांचे व्यवसाय विस्कळित झाले आहेत. तरीही आमच्या महसुलावर कमीत कमी परिणाम झाला आहे. दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्था सुधारल्याने हा चांगला परिणाम झाला आहे. कंपनीकडे समभागांचे एकूण १०४.१ कोटी रुपयांचे भांडवल आहे. त्यामध्ये प्रत्येकी १० रुपयांचे १०.४१ लाख समभाग (शेअर) आहेत.

हेही वाचा-महागाई-विकासदरातील संतुलनाकरिता आरबीआयकडून व्याजदर स्थिर - अर्थतज्ज्ञांचे मत

पेटीएमकडून कोरोना काळात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करून मदत

पेटीएमने विदेशात 21 हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी केले आहेत. हे कॉन्स्ट्रेटर मे महिन्याच्या आठवड्यात भारतामध्ये उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले होते. ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करण्यात आल्याची माहिती पेटीएमच्या प्रवक्त्याने माध्यमांना दिली. प्रवक्त्याने म्हटले, की पेटीएम फाउंडेशनने संकटकाळात दिलासा देण्यासाठी 21,000 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी केले आहेत. कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची टीम कोरोनाच्या काळात उपाययोजना करण्यासाठी योगदान देत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.