हैदराबाद - कोरोनाच्या संकटात देशातील बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. टाळेबंदीत उत्पन्न घसरल्याने ओला कंपनीने १ हजार ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.
ओलाचे सहसंस्थापक आणि सीईओ भाविष अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कर्मचारी कपातीची माहिती दिली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कठोर निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीचे १,४०० कर्मचारी कमी करण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा-चीनबरोबरील व्यापारी कराराबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी बदलली भूमिका, म्हणाले...
कामावरून काढण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतन देण्यात येणार आहे. कामावरून कमी केले तर सर्व कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत विम्याचे सर्व लाभ मिळू शकणार आहेत. ओलाशिवाय इतर कंपन्यांमध्ये नोकरीचे संधी मिळावी, यासाठी ओला टॅलेंट अक्वायझेशन टीमकडून मदत करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-मायक्रोसॉफ्टने तयार केला नवा सुपरकॉम्प्युटर; 'हे' करणार काम
दरम्यान, नुकतेच उबर, झोमॅटो अशा विविध कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे.