नवी दिल्ली - ओला ग्रुपने 'ड्रायव्ह द ड्रायव्हर फंड अंडर ओला फाउंडेशन'करिता २० कोटी रुपये दान देण्याचे जाहीर केले आहे. या पैशांचा उपयोग ऑटोरिक्षा, कॅब, काळी-पिवळी आणि टॅक्सी चालकांकरिता करण्यात येणार आहे.
ओला कंपनीचे सीईओ भविष्य अग्रवाल यांनी एक वर्षाचे वेतन देण्याचे जाहीर केले आहे. कंपनीचे सुमारे २० लाख चालक आणि भागीदार आहेत. ओलाने चालकांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी जमविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
संकटाच्या काळात ओलाचा कणा असलेल्या वाहनचालकांना उत्पन्न मिळत नाही. ओला ग्रुपने त्यांना योगदान देण्याकरता प्रारंभिक भांडवलाचे योगदान केले आहे. त्याचा तत्काळ उपयोग करता येईल, असे ओलाचे संवाद प्रमुख आनंद सुब्रमण्यन यांनी सांगितले.
हेही वाचा-बँकांच्या शाखांचे कामकाज सुरू, अफवांवर विश्वास ठेवू नये - सरकारचे आवाहन
गेल्या आठवड्यात ओलाने सर्व वाहनचालक आणि त्यांच्या पत्नीसाठी कोरोना झाल्यास विमा संरक्षण देणार असल्याचे जाहीर केले होते.