नवी दिल्ली - निस्सान मोटार इंडियाने सर्व वाहनांच्या किमती ५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. वाहनांच्या उत्पादनाचा खर्च वाढल्याने या किमती वाढविण्यात येणार आहेत.
निस्सान आणि डाटसनच्या सर्व मॉडेलच्या किमती जानेवारीपासून वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या बाजारपेठेत आव्हानात्मक स्थिती आहे. अशा स्थितीत निस्सान आणि डाटसनच्या किमती वाढविण्याचा निर्णय जाहीर घेतल्याचे कंपनीचे व्यस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले.
हेही वाचा-'मारुती सुझुकी' जानेवारीपासून वाढविणार वाहनांच्या किमती
यापूर्वीच मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटार इंडिया, टाटा मोटर्सने वाहनांच्या किमती जानेवारीपासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.