ETV Bharat / business

टाटा ग्रुपबरोबर कायदेशीर लढाई हरल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया - टाटा सायरस मिस्त्री वाद न्यूज

सायरस मिस्त्री म्हणाले की, जरी मी टाटा ग्रुपवर थेट प्रभाव टाकण्यास सक्षम नाही. असे असले तरी मी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे पडसाद उमटतील, अशी आशा आहे. मी स्पष्ट अशा सद्विवेकबुद्धीने झोपतो.

Cyrus Mistry
सायरस मिस्त्री
author img

By

Published : Mar 30, 2021, 6:27 PM IST

मुंबई - टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत निराशा व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एनएसीएलएटीचे आदेश रद्द केल्याने सायरस मिस्त्री यांना पुन्हा टाटा सन्सचे चेअरमन पद मिळू शकणार नाही. त्याबाबत प्रतिक्रिया देताना मिस्त्री म्हणाले की, माझी सद्विवेकबुद्धी स्पष्ट आहे. अल्पसंख्यांक शेअर भागीदार म्हणून वैयक्तिकरित्या निराश असल्याचे मिस्त्री यांनी म्हटले आहे.

सायरस मिस्त्री म्हणाले की, जरी मी टाटा ग्रुपवर थेट प्रभाव टाकण्यास सक्षम नाही. असे असले तरी मी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे पडसाद उमटतील, अशी आशा आहे. मी स्पष्ट अशा सद्विवेकबुद्धीने झोपतो. आयुष्य नेहमीच छान असू शकत नाही. मात्र, मला माझे कुटुंब, मित्र, आजी-माजी सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. मी माझ्या कायदेशीर टीमबाबत कृतज्ञ आहे. टाटा सन्सच्या चेअरमनपदाची जबाबदारी मिळाली होती, त्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

संबंधित बातमी वाचा-सायरस मिस्त्रींबरोबरील वादात 'सर्वोच्च' विजय; रतन टाटांनी ही' दिली प्रतिक्रिया

रतन टाटा यांनी ही दिली होती प्रतिक्रिया-

सर्वोच्च न्यायालयाने एनसीएलएटीचे आदेश रद्द केल्यावर रतन टाटा यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली होती. टाटा सन्सचे चेअरमन टाटा म्हणाले की, हा जिंकण्याचा किंवा हरण्याचा मुद्दा नव्हता. माझ्या प्रामाणिकतेवर आणि नीतमत्तेच्या वागणुकीवर कठोर हल्ले करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाच्या निकालाने टाटा सन्सचे मूल्य आणि नैतिकतेचे सर्व अपील हे वैध ठरविले आहेत. न्यायव्यवस्थेने दाखविलेली निष्पक्षता आणि न्यायाला मजबुती देते.

संबंधित बातमी वाचा-टाटा -सायरस मिस्त्री वाद; सर्वोच्च न्यायालयाकडून एनसीएलएटीचे आदेश रद्द

काय आहे टाटा - सायरस मिस्त्री वाद ?

टाटा सन्सच्या संचालक मंडळाने सायरस मिस्त्री यांना चेअरमन पदावरून काढले होते. या निर्णयाला मिस्त्री यांनी एनसीएलएटीमध्ये आव्हान दिल्यानंतर एनसीएलएटीने मिस्त्री यांच्या बाजूने निकाल दिला होता. या निकालाला टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला टाटा सन्सच्या बाजुने निकाल दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.