नवी दिल्ली- मुथुट फायनान्सचे चेअरमन एम. जी. जॉर्ज यांचे नवी दिल्लीत राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांनी स्थापन केलेली मुथुट फायनान्स ही सोन्यावर कर्ज देणारी सर्वात मोठी एनबीएफसी आहे. त्यांचे शुक्रवारपी सायंकाळी निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.
७१ वर्षीय एम. जी. जॉर्ज हे अनेक वर्षांपासून दिल्लीत राहत होते. त्यांचे सोने कर्जासह सिक्युरिटी असे २०हून अधिक उद्योग आहेत. यामध्ये स्थावर मालमत्ता, पायाभूत क्षेत्र, आदरातिथ्य आणि शिक्षण या उद्योगांचा समावेश आहे. त्यांच्या कंपनीचे कोचीमध्ये मुख्यालय आहे. मुथाई जॉर्ज जॉर्ज मुथुट यांचा १९४९ मध्ये केरळमध्ये जन्म झाला होता.
हेही वाचा-टेस्लाची नवीन वेबसाईट लाँच; वापरकर्त्यांना करता येणार पोस्ट
देशातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत ४४ वा क्रमांक
एम. जी. जॉर्ज यांनी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मॅकनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. मुथुट फायनान्सने डिसेंबर २०२० अखेर ५६,००० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. फोर्ब्स आशियाच्या यादीनुसार २०२० मध्ये ते देशातील ४४ व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत भारतीय होते.
हेही वाचा-कोरोनाशी लढा: टीव्हीएस कंपनी सर्व कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना देणार मोफत लस