नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा जगातील श्रीमंताच्या यादीत आठवा क्रमांक आला आहे. त्यांची एकूण ८३ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ही आकडेवारी हरुण ग्लोबलने जाहीर केली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिलायन्स एनर्जी आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याने अंबानी यांच्या एकूण संपत्तीत वाढ झाली आहे. गतवर्षी हरुण ग्लोबल श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी यांचा नववा क्रमांक होता.
हेही वाचा-धक्कादायक! चिनी हॅकरकडून सीरमसह भारत बायोटेकवर सायबर हल्ला- अहवाल
काय म्हटले आहे हरुण संस्थेने?
- रिलायन्स ही देशातील सर्वात मोठी निर्यातदार कंपनी आहे.
- देशाच्या एकूण निर्यातीत रिलायन्सचा ८ टक्के हिस्सा आहे. तर उत्पादन आणि सीमा शुल्कामधून देशाला मिळणाऱ्या उत्पन्नात रिलायन्सचा ५ टक्के हिस्सा आहे.
- रिलायन्स ही तेल उर्जेहून अपारंपरिक उर्जेकडे लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच कंपनीकडून इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरी उद्योगातही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे हरुण या संस्थेने म्हटले आहे.
मुंबई ही देशातील अब्जाधीशांची राजधानी
- अब्जाधीशांच्या संख्येत भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे.
- भारतात गतवर्षीहून ४० तर एकूण १७७ अब्जाधीश आहेत.
- मुंबई ही देशातील अब्जाधीशांची राजधानी आहे. मुंबईत ६१ अब्जाधीश राहतात. त्यानंतर नवी दिल्लीत ४० अब्जाधीश राहतात.
- अब्जाधीशांचे सरासरी वय ६६ आहे. तर ३२ हून अधिक अब्जाधीश मूळचे भारतीय असून विदेशात राहतात. यामध्ये आर्सेलरमित्तल उद्योग समुहाचे मालक मित्तल यांचा समावेश आहे.
हेही वाचा-एलपीजी गॅसमध्ये आणखी २५ रुपयांची दरवाढ; एका महिन्यांदा चौथ्यांदा महागाईचा चटका
अब्जाधीशांच्या सपंत्तीत अशी झाली वाढ-
- गौतम अदानी यांचा भारतामधील आघाडीच्या १०० अब्जाधीशांमध्ये ४८ वा क्रमांक आहे. अदानी यांची संपत्ती गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट होऊन ३२ डॉलर आहे. तर अदानी ग्रीन एनर्जीची संपत्ती ही २० अब्ज डॉलर आहे.
- जगात सर्वाधिक श्रीमंत हे टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही १९७ अब्ज डॉलर आहे. त्यांच्या संपत्तीत २०२० मध्ये तिप्पटीने वाढ झाली आहे.
- अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा जगातील श्रीमंताच्या यादीत दुसरा क्रमांक आहे. त्यांच्या संपत्तीत गतवर्षी ३५ टक्क्यांनी वाढ होऊन एकूण संपत्ती ही १८९ अब्ज डॉलर आहे.