ETV Bharat / business

मुकेश अंबानींकडून विविध ई-कॉमर्स कंपन्या खरेदी करण्याकरता बोलणी सुरू - Reliance Industries latest news

देशात किरकोळ बाजारपेठेची ई-कॉमर्समध्ये मोठी बाजारपेठ आहे. रिलायन्सच्या ई-कॉर्मस व्यवसायाला अॅमेझॉनकडून मोठी स्पर्धा आहे. अशातच रिलायन्स ही फर्निचर आऊटलेट, अर्बन लॅडर, झिवामी आणि नेटमेड्सच्या खरेदीसाठी चर्चा करत आहे.

संग्रहित-मुकेश अंबानी
संग्रहित-मुकेश अंबानी
author img

By

Published : Aug 18, 2020, 4:06 PM IST

नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे किरकोळ बाजारपेठेतील व्यवसायाचा अधिक विस्तार करणार आहेत. त्यासाठी विविध ई-कॉर्मस कंपन्यांच्या खरेदीसाठी अंबानी हे बोलणी करत आहेत.

देशात किरकोळ बाजारपेठेची ई-कॉमर्समध्ये मोठी बाजारपेठ आहे. रिलायन्सच्या ई-कॉर्मस व्यवसायाला अ‌ॅमेझॉनकडून मोठी स्पर्धा आहे. अशातच रिलायन्स ही फर्निचर आऊटलेट, अर्बन लॅडर, झिवामी आणि नेटमेड्सच्या खरेदीसाठी चर्चा करत आहे.

या कंपन्यांची रिलायन्स इंडस्ट्रीज करू शकते खरेदी-

रिलायन्स ही झिवामी कंपनी 160 दशलक्ष डॉलरलला खरेदी करू शकते. तर अर्बल लॅडरबरोबर रिलायन्सकडून 30 दशलक्षचा सौदो होवू शकतो. रिलायन्स नेटमेडची 120 दशलक्ष डॉलरला खरेदी करू शकते. दूध कंपनी मिल्कबास्केटची खरेदी करण्याचा रिलायन्ससमोर पर्याय आहे.

किशोर बियाणी यांची मालकी असलेल्या फ्युचअर ग्रुपची मालमत्ताही रिलायन्स खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, रिलायन्सने त्या अफवा असल्याचे सांगत प्रतिक्रिया देणे शक्य नसल्याचे म्हटले होते. असे असले तरी कंपनीकडून विविध संधींचे मूल्याकंन नियमितपणे करण्यात येते, असे रिलायन्सने म्हटले होते.

यापूर्वी रिलायन्सने सावन, ग्रॅब ग्रब सर्व्हिसेस, हॅपटीक आर्टिफिशियल इंटेलिजन्ट चॅटबुट अशा विविध कंपन्यांची खरेदी केली आहे. दरम्यान, रिलायन्स जिओमधील हिस्सा विकल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजला 20 अब्ज डॉलर मिळाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.