ETV Bharat / business

३.५ दशलक्ष भारतीयांचा डाटा गहाळ नाही; मोबिक्विककडून खुलासा - मोबिक्विक डाटा लीक न्यूज

मोबिक्वीक चालू वर्षात आयपीओ आणून २०० ते २५० दशलक्ष डॉलर संकलित करणार आहे. मात्र, त्यापूर्वी कंपनी ही वापरकर्त्यांचा डाटा लीक झाल्याच्या संशयामुळे चर्चेत आली आहे.

MobiKwik
मोबिक्विक
author img

By

Published : Mar 29, 2021, 7:37 PM IST

नवी दिल्ली - डिजीटल वॉलेट आणि देयक व्यवहार कंपनी मोबिक्वीकने वापरकर्त्यांचा डाटा लीक झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. काही सायबर सुरक्षा संशोधकांनी मोबिक्वीकचा डाटा डार्कवेबवर उपलब्ध असल्याचा दावा केला होता.

मोबिक्वीक चालू वर्षात आयपीओ आणून २०० ते २५० दशलक्ष डॉलर संकलित करणार आहे. मात्र, त्यापूर्वी कंपनी ही वापरकर्त्यांचा डाटा लीक झाल्याच्या संशयामुळे चर्चेत आली आहे. सायर सुरक्षा संशोधकांनी मोबिक्वीकमधील ३.५ दशलक्ष लोकांचा केवायसीचा डाटा डार्क वेबवर उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. याबाबत पहिले ट्वीट सायबर सुरक्षा संशोधक राजशेखर राजहरियांनी केले होते. त्यानंतर फ्रान्सच्या सायबर सुरक्षा संशोधक एलियट एल्डरसनने ८.२ टीबी डाटा हा लीक झाल्याचे म्हटले आहे. या डाटामध्ये वापरकर्त्यांचे फोन क्रमांक, ईमेल, हॅश पासवर्ड, पत्ता, बँकांचे अकाउंट क्रमांक आणि कार्डची माहिती यांचा समावेश आहे.

हेही वाचा-देशात कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण; शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता

मोबिक्विकने ही दिली प्रतिक्रिया-

मोबिक्विकने डाटा लीक झालेले सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहे. काही स्वयंघोषित सुरक्षा संशोधकांकडून मनाने तयार केलेल्या फाईलमधून आमचा मूल्यवान वेळ घालविण्यात येत आहे. आम्ही त्याबाबत संशोधन केले आहे. आम्हाला सुरक्षेबाबत कोणतीही त्रुटी आढळली नाही. आमचे वापरकर्ते आणि त्यांचा डाटा हा पूर्णपणे सुरक्षित आहे. संशोधकांच्या दाव्यानुसार भारतीय वापरकर्त्यांचा डाटा हा १ बिटकॉईनला म्हणजे सुमारे ८४,००० डॉलरला डार्कवेबवर उपलब्ध आहे.

हेही वाचा-कोरोनाचा वाढता संसर्ग; सीरमकडून इतर देशांना लस मिळण्यास होणार उशीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.