ETV Bharat / business

मुंबई इंडियन्सची फुटबॉल संघाबरोबर टक्कर; जगातील टॉप १० लोकप्रिय संघात समावेश

एप्रिलमध्ये मुंबई इंडियन्स हा आशिया संघामध्ये यु ट्युब पेजवर सर्वात अधिक व्युव्ज मिळविणारा क्रीडा संघ ठरला होता. मुंबई इंडियन्सने यु ट्युब पेजवर १.६१  कोटी व्युव्ज मिळविले होते.

मुंबई इंडियन्स
author img

By

Published : May 6, 2019, 9:53 PM IST

नवी दिल्ली - जगभरात फुटबॉल आणि क्रिकेट या दोन खेळांचे अनेक चाहते आहे. मात्र भारतातील इंडियन प्रिमिअर लीगची (आयपीएल) फ्रँचाईज असलेल्या मुंबई इंडियन्स ही चाहत्यांच्या ऑनलाईन संख्येत फुटबॉलच्या नामांकित संघांना टक्कर देऊ लागली आहे. मुंबई इंडियन्स जगभरातील सर्वात अधिक १० लोकप्रिय संघापैकी एक संघ असल्याचे मार्च २०१९ मधील पाहणीदरम्यान दिसून आले आहे. यावेळी इन्स्टाग्रामवर मुंबई इंडियन्सला ३ कोटी ४३ लाख व्युव्ज (views) मिळाले आहेत.

जगातील टॉप १० मध्ये झळकलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे जगातील केवळ दोनच क्रिकेट संघ आहेत. तर आशियातील एकमेव क्रीडा संघ ठरले आहेत. या यादीमध्ये बहुतेक फुटबॉल संघाचे वर्चस्व आहे. या यादीत बार्सेलोना ही १०.८ कोटी व्युव्ज मिळवून सर्वप्रथम आहे. त्यानंतर लिव्हरपूल ९.३३ कोटी व्युव्ज मिळवून दुसऱ्या तर, जुवेन्टस ६.५६ कोटीने तिसऱ्या क्रमांकावर आहे.

एप्रिलमध्ये मुंबई इंडियन्स हा आशिया संघामध्ये यु ट्युब पेजवर सर्वात अधिक व्युव्ज मिळविणारा क्रीडा संघ ठरला होता. मुंबई इंडियन्सने यु ट्युब पेजवर १.६१ कोटी व्युव्ज मिळविले होते. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (७२ लाख ६० हजार ) आणि चेन्नई सुपर किंग्ज (६७.३ लाख) यांनी आशियातील यादीत पहिल्या तीनमध्ये क्रमांक पटकाविला होता. मुंबई इंडियन्सचा यु ट्युब व्हिडिओ कंटेनमध्ये जगात तिसरा क्रमांक आहे. तर एफसी बार्सेलोना ३.५९ कोटी व्युव्ज मिळून पहिल्या क्रमांकावर आहे. हा सर्व्हे डिपॉर्टस आणि फायनाझास या स्पॅनिश क्रीडा व्यवस्थापन कंपनीने केला. यामध्ये सर्व खेळांचा सोशल मीडियातील प्रभाव दाखविण्यात आलेला आहे. मुंबई इंडियन्सला अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी प्रायोजकत्व देण्यात आजवर स्वारस्य दाखविलेले आहे.

Intro:Body:

State 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.