नवी दिल्ली - प्रवासी वाहनांच्या विक्रीपाठोपाठ आलिशान चारचाकी उत्पादक कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. मर्सिडिज-बेन्झच्या वाहनांची जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान गतवर्षीच्या तुलनेत १५.८९ टक्क्यांनी विक्री घटली आहे.
मर्सिडिजने गतवर्षी जानेवारी ते सप्टेंबर ११ हजार ७८९ वाहनांची विक्री केली होती. मात्र, यंदा ९ हजार ९१५ वाहनांची विक्री केली आहे. असे असले तरी कंपनीने समाधाकारक विक्री झाल्याचे म्हटले आहे. आर्थिक आव्हाने असतानाही सप्टेंबरमध्ये वाहनांची समाधानकारक विक्री झाली आहे. आलिशान चारचाकींच्या बाजारपेठेत आघाडीचे स्थान टिकविल्याचा आनंद असल्याचे मर्सिडिज-बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मार्टिन शेवेन्क यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-शेअर बाजारात ४१४ अंशाची उसळी; अमेरिका-चीनमध्ये करार होण्याच्या शक्यतेचा परिणाम
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कंपनीच्या १० हजार वाहनांची विक्री झाली आहे. ई-क्लास वाहनांची सर्वात अधिक विक्री झाली. सी-क्लास सेडान आणि जीएलसी एसयूव्ही वाहनांचा विक्रीच्या व्यवसायात मोठा वाटा राहिला आहे. जीएलएस एसयूव्ही वाहनांची चांगली मागणी होती, असे कंपनीने म्हटले आहे. सकारात्मक वातावरण आणि ग्राहकांचा रस लक्षात घेता चौथ्या तिमाहीत वाहनांचे नवे मॉडेल लाँच करणार असल्याचेही कंपनीने म्हटले.
हेही वाचा-७४० कोटींच्या फसवणूक प्रकरणी रॅनबॅक्सीच्या शिविंदर सिंगला अटक