नवी दिल्ली- मारुती इंडियाने महिंद्रा फायनान्सबरोबर वाहन कर्जासाठी करार केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वाहन कर्ज मिळण्याचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.
मारुती इंडिया आणि महिंद्रा फायनान्स या कंपनीने कोरोना महामारीच्या काळात ग्राहकांना वैयक्तिक वाहन कर्ज देण्यासाठी एकत्रित आल्या आहेत.
महिंद्रा फायनान्स ही बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आहे. या कंपनीचे देशभरात नेटवर्क असल्याचे मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले.
मारुतीच्या वाहनांची ग्रामीण भागात एक तृतीयांश विक्री होते.
मारुतीचे देशात 3 हजार 86 शोरूम आहेत. तर महिंद्रा फायनान्सच्या देशात 1हजार 450 शाखा आहेत.
दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीतून नोकरदार, रोजगार, शेतकरी व व्यावसायिक यांना कर्ज मिळू शकणार आहे. ग्राहकांना मासिक हप्ता, वाहन खरेदीबाबत इतर कर्जाचे पर्याय मिळू शकणार आहेत.
टोयोटो किर्लोस्करनेही ग्राहकांना चारचाकी खरेदीसाठी सुलभ मासिक हफ्ता योजना आणली आहे. कंपनीने ग्राहकांना माहिती देण्यासाठी 83676 83676 हा व्हॉटसअप उपलब्ध करून दिला आहे.