नवी दिल्ली - मारुती सुझुकीने अल्टोचे 'अल्टो व्हीएक्सआय प्लस' हे नवे मॉडेल लाँच केले आहे. या मॉडेलची किंमत ३ लाख ८० हजार (एक्सशोरुम दिल्ली) रुपये किंमत आहे.
नव्या अल्टोच्या मॉडेलमध्ये उच्च इंधन क्षमतेसह सुरक्षेचे नवी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. मारुती सुझुकीने अल्टो व्हीएक्सआय प्लस लाँच केल्याची आज घोषणा केली आहे. यामध्ये इन्फोटेनमेंट असलेला १७.८ इंच स्क्रीनचा स्मार्टप्ले स्टुडिओ आहे. त्यामध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटोची सुविधा असणार आहे.
हेही वाचा-नागरिकांनी घरातील सोने बँकेत ठेण्याकरता सरकार आणणार सुधारित योजना
हे आहेत अल्टोच्या नव्या मॉडेलची वैशिष्ट्ये-
- नव्या मॉडेलमध्ये नव्या निकषानुसार बीएस-६ इंजिन कार्यक्षमता आहे. त्यामधून प्रति लिटर २२.०५ किमीची प्रवास होईल अशी उच्च इंधन क्षमता आहे.
- अल्टो व्हीएक्सआय प्लसमध्ये सुरक्षेसाठी दोन एअरबॅग आहेत. तर रिव्हर्स पार्किंगसाठी सेन्सर देण्यात आलेली आहे. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी इशारा देणारी यंत्रणा आहे.
- सीटबेल्ट लावण्याची चालकासह प्रवाशांना आठवण (रिमाईंडर) करून देणारी सुविधा आहे.
- स्मार्ट प्ले स्टुडिओमध्ये ग्राहकांना नव्या तंत्रज्ञानाची अनुभूती घेण्यात येते.
हेही वाचा-प्रचंड मंदीला सामोरे जाणाऱ्या भारताची अर्थव्यवस्था 'आयसीयू'च्या दिशेने
गेली सलग १५ वर्षे अल्टो ही देशातील सर्वात विकली जाणारी कार ठरली आहे. हीच परंपरा अल्टो व्हीएक्सआय प्लस सुरू ठेवेल, असा विश्वास मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) शंशाक श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.