ETV Bharat / business

मारुती सुझुकी ६३ हजार ४९३ वाहने परत मागविणार; 'हे' आहे कारण

मोटार जनरेटरमध्ये दोष असल्याची शक्यता असल्याने त्या वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याचे मारुती सुझुकीने म्हटले आहे. हा दोष विदेशातील पुरवठादाराच्या सुट्ट्या भागांमुळे निर्माण झाल्याची कंपनीने शक्यता व्यक्त केली आहे.

Maruti Suzuki
मारुती सुझुकी
author img

By

Published : Dec 6, 2019, 3:51 PM IST

नवी दिल्ली - मारुती सुझुकीने पेट्रोल स्मार्ट हायब्रीड (एसएचव्हीएस) श्रेणीतील सियाझ, एरटिगा आणि एक्सएल ६ हे मॉडेल परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या श्रेणीतील ६३ हजार ४९३ वाहनांच्या मोटार जनरेटरमध्ये दोष असल्याची शक्यता आहे.

मोटार जनरेटरमध्ये दोष असल्याची शक्यता असल्याने त्या वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याचे मारुती सुझुकीने म्हटले आहे. हा दोष विदेशातील पुरवठादाराच्या सुट्ट्या भागांमुळे निर्माण झाल्याची कंपनीने शक्यता व्यक्त केली आहे. ही वाहने १ जानेवारी २०१९ ते २१ नोव्हेंबर २०१९ दरम्यान उत्पादित करण्यात आलेली आहेत. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन वाहने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. व्यवस्थित असलेली वाहने लगेच परत दिली जाणार आहेत. तर सदोष असलेल्या सुट्टा भाग हा मोफत बदलून देण्यात येणार आहे. वाहने परत बोलाविण्याची मोहीम (रिकॉल कॅम्पेन) आजपासून सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा-'सरकारने दिलासा दिला नाही तर व्होडाफोन-आयडिया होईल बंद'

जगभरातील अनेक कंपन्या वाहनांमध्ये दोष आढळून आल्यास वाहने परत बोलाविण्याची मोहीम (रिकॉल कॅम्पेन) जाहीर करतात.

काय आहे मोटार जनरेटर युनिट ?

मोटार जनरेटरचा उपयोग वेग नियंत्रण व उर्जा रुपांतरणासाठी करण्यात येतो.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.