ETV Bharat / business

जिओपाठोपाठ अॅमेझॉनही दुकानदारांना देणार ऑनलाईन सुविधा

अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष (विक्रेते सेवा) गोपाल पिल्लई म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही ५ हजार ऑफलाईन विक्रेत्यांसाठी प्रायोगिक कार्यक्रम सुरू केला आहे. यामधून स्थानिक विक्रेत्यांना ऑनलाईन सेवेचा लाभ देणे हा हेतू आहे.

अॅमेझॉन
अॅमेझॉन
author img

By

Published : Apr 24, 2020, 11:22 AM IST

नवी दिल्ली - अॅमेझॉनने स्थानिक दुकानांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म देण्यासाठी सेवा लाँच केली आहे. 'लोकल शॉप्स ऑन अॅमेझॉन' या सेवेमधून लहान दुकाने आणि किरकोळ विक्रेत्यांना ऑनलाईन उत्पादने विकता येणार आहेत.

रिलायन्सने जिओमार्ट-व्हॉट्सअॅपच्या भागीदारीतून किराणा दुकाने ऑनलाईन करण्याची घोषणा केल्यानंतर अॅमेझॉनही स्पर्धेत वेगाने पावले टाकायला सुरुवात केली आहे. अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष (विक्रेते सेवा) गोपाल पिल्लई म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही ५ हजार ऑफलाईन विक्रेत्यांसाठी प्रायोगिक कार्यक्रम सुरू केला आहे. यामधून स्थानिक विक्रेत्यांना ऑनलाईन सेवेचा लाभ देणे हा हेतू आहे. त्यासाठी अॅमेझॉनकडून १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामध्ये दुकानदारांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा उद्देश आहे.

हेही वाचा-इंडिगोचा 'यू टर्न'; कर्मचाऱ्यांचे २५ टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय रद्द

दुकानदारांना कोणत्या ठिकाणी विक्री करायची व किती वाजता डिलिव्हरी द्यायची आहे, याचा ऑनलाईनमध्ये पर्याय असणार आहे. त्यासाठी स्थानिक दुकानदारांनी अॅमेझॉन डिलिव्हरी अॅपचा वापर करावा लागणार आहे. त्यामधून अॅमेझॉन ग्राहकांच्या डिलिव्हरीची माहिती देणार आहे. तर ग्राहकाला डिलिव्हरीची तंतोतंत माहिती मिळणार आहे.

हेही वाचा-कोरोनाशी लढा: सरकार १५.४० कोटी एचसीक्यू गोळ्यांचा देशात करणार पुरवठा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.