नवी दिल्ली - सरकते जिने आणि उद्वाहिनीचे (लिफ्ट) उत्पादन करणारी कोन कंपनीने पुण्यात नवे तंत्रज्ञान केंद्र सुरू केले आहे. त्यासाठी कंपनीने सुमारे १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
कोनने पुण्यात २० हजार स्क्वेअर फूटची जागा भाड्याने घेतली आहे. त्याठिकाणी सुमारे १२० लोक काम करणार आहेत. या केंद्रातून व्यवसायावर देखरेख व सेवा व्यवस्थापन करण्यात येणार आहे. सखोल संशोधन, तंत्रज्ञानाचा विकास आणि अभियांत्रिकीसाठी भारताबरोबर भागीदारी करण्यात येत असल्याचे कोन इंडियाचे अमित गोस्सॅन यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, कंपनी वाढत्या भारतीय बाजारपेठेला अत्याधुनिक सुविधांनी चांगली सेवा देवू शकते. नुकतेच उद्वाहिनी आणि सरकत्या जिन्यांना इंटरनेट ऑफ थिंग्जने जोडणारी २४ X ७ सेवा लाँच करण्यात आली होती. यामुळे यंत्रणेत कमी दोष होवून ती यंत्रणा बंद पडण्याचे प्रमाण कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे यंत्रणेत कमी दोष असणार आहेत. लवकर दुरुस्ती होणार असल्याने ग्राहकांना खऱ्या अर्थाने मनशांती लाभणार आहे.
-
We are proud to announce the opening of our New Technology and Innovation Center in Pune pic.twitter.com/n1rLfx1n4S
— KONE Elevator India (@KONEIndia) October 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We are proud to announce the opening of our New Technology and Innovation Center in Pune pic.twitter.com/n1rLfx1n4S
— KONE Elevator India (@KONEIndia) October 4, 2019We are proud to announce the opening of our New Technology and Innovation Center in Pune pic.twitter.com/n1rLfx1n4S
— KONE Elevator India (@KONEIndia) October 4, 2019
हेही वाचा-विदेशी चलन गंगाजळीत विक्रमी वाढ होऊन ४३४.६ अब्ज डॉलरची नोंद
कोन ऑपरेशनचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मॅकिज क्रॅन्झ म्हणाले, कोन कंपनीकडून जगभरात नवसंशोधनाची रणनीती अवलंबिण्यात येत आहे. आम्ही सातत्याने आमचे तंत्रत्रान विकसित करत आहोत. हा आमच्या शहरी जीवनमानाचा दर्जा उंचावण्याच्या बांधिलकीचा भाग असल्याचे यांनी सांगितले.
हेही वाचा-पाककृतीत 'ट्रान्स फॅट' मुक्त तेलाचा करणार वापर; १ हजारहून अधिक आचारींनी घेतली शपथ
कंपनीचे चेन्नईमध्ये उत्पादन प्रकल्प आणि तंत्रज्ञान केंद्र आहे. यातून देशातील बाजारपेठेला सरकते जिने आणि उद्वाहिनीचा पुरवठा होतो. तसेच विदेशात बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेत निर्यात करण्यात येते. कंपनीच्या एकूण बाजारपेठेपैकी भारतात २५ टक्के हिसा आहे. कोन इंडिया कंपनीत सुमारे ५ हजार कर्मचारी काम करतात.
हेही वाचा-पीएमसी घोटाळा : बँकेचा माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमसला अटक