ETV Bharat / business

फ्लिपकार्टसह अ‌ॅमेझॉनच्या चौकशीला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती - Confederation of All India Traders

अ‌ॅमेझॉन व फ्लिपकार्टची विदेशी चलन हस्तांतरण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ईडीकडून गतवर्षी चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी आधी पूर्ण होऊ द्यावी, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Amazon, Flipkart
फ्लिपकार्ट, अ‌ॅमेझॉन
author img

By

Published : Feb 14, 2020, 4:17 PM IST

बंगळुरू - अनुचित व्यापाराचा आरोप झालेल्या फ्लिपकार्ट व अ‌ॅमेझॉनला दिलासा मिळाला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने फ्लिपकार्ट आणि अ‌ॅमेझॉनच्या दिलेल्या चौकशीच्या आदेशाला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

अ‌ॅमेझॉन व फ्लिपकार्टची विदेशी चलन हस्तांतरण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ईडीकडून गतवर्षी चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी आधी पूर्ण होऊ द्यावी, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) आणि अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) आठ दिवसात उत्तर देण्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.

हेही वाचा-देशातील आर्थिक वातावरण कमकुवत कमी होत असताना आयएमफने 'हा' दिला सल्ला

अ‌ॅमेझॉनने कर्नाटक उच्च न्यायालयात सोमवारी याचिका दाखल केली आहे. यामध्ये सीसीआयच्या चौकशीच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. सीसीआयने कोणताही विचार न करता आदेश दिल्याने कंपनीच्या प्रतिष्ठेचे मोठे नुकसान झाल्याचे अ‌ॅमेझॉनने याचिकेत म्हटले होते. अ‌ॅमझॉनसह फ्लिपकार्टकडून ठराविक विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात प्राधान्याने सवलती देण्यात येतात, असा आरोप आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे सीसीआयने जानेवारीत आदेश दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.