नवी दिल्ली - रिलायन्स जिओने ग्राहकांना पैसे कमविण्यासाठी खास ऑफर आणली आहे. दुसऱ्यांचे रिचार्ज केले तर ग्राहकांना ४ टक्के कमिशन मिळणार आहे.
रिचार्ज करणाऱ्यांना कमिशन मिळवून देण्यासाठी रिलायन्स जिओने जिओपीओएस लाईट अॅप लाँच केले आहे. यामधून ग्राहकांना इतरांचे रिचार्ज करता येणार आहे. या अॅपसाठी १ हजार रुपये ग्राहकांना भरावे लागतात. मात्र, सुरुवातीच्या काळात हे शुल्क माफ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. सुरुवातीला ग्राहकांना किमान १ हजार रुपयांचा बॅलन्स करावा लागणार आहेत. त्यानंतर किमान २०० रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. टाळेबंदीत दुकाने बंद असल्याने अनेकांना रिचार्ज करणे शक्य होत नाही. त्यांना अॅपचा फायदा होणार आहे.
हेही वाचा-टोल वसूली २० एप्रिलपासून होणार सुरू; मोटार वाहतूक संघटनेचा विरोध
गेल्या काही दिवसात जिओपीओएस लाईट अॅप हे ५ लाख जणांनी डाऊनलोड केले आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलने प्रीपेड कार्डची मुदत २० एप्रिलपर्यंत वाढविली आहे. तर शून्य बॅलन्स असेल्या ग्राहकांना १० रुपयांचा अतिरिक्त टॉकटाईम दिला आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दूरसंचार ऑपरेटर कंपन्यांना प्रिपेड कार्डची मुदत वाढविण्याची सूचना केली आहे.
हेही वाचा-टीव्हीएस मोटर कंपनीने इंग्लंडमधील 'या' दुचाकी कंपनीची घेतली मालकी