मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजने जीओ फोन वापरकर्त्यांना कोरोनाच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. जिओ फोन वापरकर्त्यांना दर महिन्याला ३०० मिनिटे कॉलिंग मोफत मिळणार आहे. ही सेवा संपूर्ण महामारीत मिळणार आहे.
आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आणि सर्वांना परवडणाऱ्या दरात कॉलिंगची सेवा उपलब्ध करून देण्याची इच्छा असल्याचे जिओ कंपनीने म्हटले आहे. जिओ ही रिलायन्स फाउंडेशनबरोबर काम करत आहे. त्यामधून जिओ फोन वापरकर्त्यांना रोज १० मिनिटे म्हणजे मासिक ३०० मोफत मिनिटे मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांना रिचार्ज करणे शक्य झाले नाही, त्यांना फायदा होणार आहे.
हेही वाचा-सुवर्णरोख्यात गुंतवणुकीची या पाच दिवसात मिळणार संधी; जाणून घ्या, अधिक माहिती
एका रिचार्च प्लॅनवर तेवढ्याच किमतीचे रिचार्ज मोफत-
जिओफोन वापरकर्त्याला जेवढे रिचार्ज केले, तेवढ्याच मिनिटांचे रिचार्ज मोफत मिळणार आहे. याचा अर्थ जर जिओफोन वापरकर्त्याने ७५ रुपयांचे रिचार्ज केले तर त्याला ७५ रुपयाचे रिचार्ज मोफत मिळणार आहे. जे ग्राहक वार्षिक पॅक घेत आहेत अथवा डिव्हाईस बंडल प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना ही ऑफर मिळणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
हेही वाचा-सलग दुसऱ्या वर्षी अक्षयतृतीयेला 'लॉकडाऊन'; सराफ व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे होणार नुकसान
सध्याच्या कठीण प्रसंगात प्रत्येक भारतीयाबरोबर राहण्यासाठी रिलायन्स कटिबद्ध आहे. तसेच कठीण प्रसंगात महामारीवर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत, असे रिलायन्सने म्हटले आहे.
दरम्यान, रिलायन्सने गुजरातमधील जामनगर प्रकल्पामधून महाराष्ट्रासह गुजरातला मोफत ऑक्सिजन पुरविला आहे.