ETV Bharat / business

जिओ जगातील सर्वात मोठी सागरी केबल सिस्टिम बांधणार; भारत असणार केंद्रस्थानी - jio fiber optic submarine system

जगात पहिल्यांदाच सागरी दूरसंचार फायबर ऑप्टिकलच्या नेटवर्कमध्ये केंद्रस्थानी भारत असणार आहे. त्यामधून जिओच्या २०१६ च्या लाँचिंगनंतर भारताचे वाढलेले महत्त्व, वृद्धी आणि डाटाचा वाढलेला वापर अधोरेखित होतो.

Jio
जिओ
author img

By

Published : May 17, 2021, 7:08 PM IST

मुंबई - रिलान्यस जिओ जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय केबल सिस्टिम बांधणार आहे. यामधे सिस्टिमध्ये भारत केंद्रस्थानी असणार आहे. त्यासाठी कंपनीने सबकॉमसारख्या जागतिक सागरी केबल पुरवठादाराशी करार केले आहेत. येणाऱ्या पिढीसासाठी वेगवान इंटरनेट उपलबद्ध करून देण्यासाठी सागरी केबल नेटवर्क उभारण्यात येणार आहे.

जगात पहिल्यांदाच सागरी दूरसंचार फायबर ऑप्टिकलच्या नेटवर्कमध्ये केंद्रस्थानी भारत असणार आहे. त्यामधून जिओच्या २०१६ च्या लाँचिंगनंतर भारताचे वाढलेले महत्त्व, वृद्धी आणि डाटाचा वाढलेला वापर अधोरेखित होतो. उच्च क्षमता आणि उच्च वेगवान व्यवस्थेमुळे २०० टीबीपीएसची क्षमता प्राप्त होणार आहे.

हेही वाचा-घाऊक बाजारपेठेत महागाईचा उच्चांक; एप्रिलमध्ये १०.४९ टक्क्यांची नोंद

महामारीमुळे डिजीटल परिवर्तनाला गती

रिलायन्स जिओचे अध्यक्ष म्हणाले, की जी ही भारतामधील डिजीटल सेवा आणि डाटाच्या वापरामध्ये आघाडीवर आहे. स्ट्रीमिंग व्हिडिओ, रिमोट वर्कफोर्स, ५जी, आयओटी या मागणीच्या पूर्ततेसाटी जीओ हे नेतृत्व करत आहे. जिओकडून आयएएक्स आणि आयईएक्स या सागरी केबल नेटवर्क जोडणीत नेतृत्व करत आहे. कोरोना महामारीच्या काळात अशा महत्त्वाच्या उपक्रमाची अंमलबजावणी करणे ही आव्हान आहे. मात्र, सध्याच्या महामारीमुळे डिजीटल परिवर्तनाला गती मिळाली आहे. त्यामुळे उच्च कामगिरी करणारी जागतिक कनेक्टिव्हटी ही एन्टरप्रायझेस आणि ग्राहकांसाठी आवश्यक आहे.

हेही वाचा-होंडाकडून मोफत सेवेसह वॉरंटीमध्ये ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

दोन-तीन वर्षांनी केबल नेटवर्क होणार कार्यान्वित-

आयएएक्स सिस्टिम ही भारत आणि आशिया पॅसिफिक बाजारपेठेला जोडते. हे सागरी केबल नेटवर्क मुंबई आणि चेन्नईवरून थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरला कनेक्ट करते. आयईएक्स सिस्टिम ही भारताला इटली, सॅवोना आणि मध्य पूर्व आणि नॉर्थ आफ्रिकेला जोडते. आयईएक्स ही २०२४ ला तर आयएएक्स ही २०२३ च्या मध्यावधीमध्ये कार्यान्वित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.