ETV Bharat / business

जेट एअरवेजच्या वैमानिकांचे थकीत वेतन द्या, संघटनेची केंद्राला विनंती

वैमानिक हे अत्यंत तणाव आणि नैराश्यावस्थेत असल्याचे एनएजीचे जनरल सेक्रेटरी तेज सूड यांनी पत्रात म्हटले आहे.  दर महिन्याला शाळा, कॉलेज, वैद्यकीय खर्च आणि वृद्ध आई-वडिलांचा खर्च करणे अशक्य झाल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

संग्रहित
author img

By

Published : Mar 16, 2019, 3:25 PM IST

नवी दिल्ली - जेट एअरवेज कंपनीने १६०० वैमानिकांच्या वेतन थकविले आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या वैमानिकांचे वेतन व्याजासह मिळावे, यासाठी सरकारने मदत करण्याची विनंती नॅशनल एविटर्स गिल्डने (एनएजी) केली आहे. नॅशनल एविटर्स गिल्डने ही वैमानिकांची संघटना आहे.

जेट एअरवेजचे प्रशासन वैमानिकांच्या प्रश्नाबाबत बहिरे झाल्याची तक्रार एनएजीने केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोश गंगवार यांना पत्र लिहून केली आहे.

वैमानिक हे अत्यंत तणाव आणि नैराश्यावस्थेत असल्याचे एनएजीचे जनरल सेक्रेटरी तेज सूड यांनी पत्रात म्हटले आहे. दर महिन्याला शाळा, कॉलेज, वैद्यकीय खर्च आणि वृद्ध आई-वडिलांचा खर्च करणे अशक्य झाल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

सर्व भत्त्यासह वैमानिकांचे वेतन व्याजासह देण्यात यावे, अशी संघटनेने मागणी केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेलाच करावे, असेही एनएजीने म्हटले आहे. या पत्राची प्रत नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे संचालक बी.एस.भुल्लर यांनाही पाठविण्यात आली आहे.

जेट एअरवेजने बँकांचे कोट्यवधींचे कर्ज थकविले आहे. तसेच वैमानिक आणि इतर पुरवठादारांचे पैसेही गेल्या काही महिन्यांपासून कंपनीने अदा केलेले नाहीत. यावर तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेज कंपनी ही सरकारी बँकासोबत बोलणी करत असल्याची सध्या चर्चा आहे.

Intro:Body:

Jet pilots seek government help to recover dues

Jet Airways pilots,National Aviators Guild,NAG,Tej Sood,General of Civil Aviation,जेट एअरवेज

जेट एअरवेजच्या वैमानिकांचे थकीत वेतन द्या, संघटनेची केंद्राला विनंती 

नवी दिल्ली -  जेट एअरवेज कंपनीने १६०० वैमानिकांच्या वेतन थकविले आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या वैमानिकांचे वेतन व्याजासह मिळावे, यासाठी सरकारने मदत करण्याची विनंती नॅशनल एविटर्स गिल्डने (एनएजी) केली आहे. नॅशनल एविटर्स गिल्डने ही वैमानिकांची संघटना आहे.

 जेट एअरवेजचे प्रशासन वैमानिकांच्या प्रश्नाबाबत बहिरे झाल्याची तक्रार एनएजीने केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोश गंगवार यांना पत्र लिहून केली आहे.

वैमानिक हे अत्यंत तणाव आणि नैराश्यावस्थेत असल्याचे एनएजीचे जनरल सेक्रेटरी तेज सूड यांनी पत्रात म्हटले आहे.  दर महिन्याला शाळा, कॉलेज, वैद्यकीय खर्च आणि वृद्ध आई-वडिलांचा खर्च करणे अशक्य झाल्याचेही संघटनेने म्हटले आहे. 

सर्व भत्त्यासह वैमानिकांचे वेतन व्याजासह देण्यात यावे, अशी संघटनेने मागणी केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेलाच करावे, असेही एनएजीने म्हटले आहे. या पत्राची प्रत नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे संचालक बी.एस.भुल्लर यांनाही पाठविण्यात आली आहे.

जेट एअरवेजने बँकांचे कोट्यवधींचे कर्ज थकविले आहे. तसेच वैमानिक आणि इतर पुरवठादारांचे पैसेही गेल्या काही महिन्यांपासून कंपनीने अदा केलेले नाहीत. यावर तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेज कंपनी ही सरकारी बँकासोबत बोलणी करत असल्याची सध्या चर्चा आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.