ETV Bharat / business

जेटची गळती : उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानंतर सीईओ विनय दुबेंचाही राजीनामा - jet issue

अमित अग्रवाल यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती जेट एअरवेजने शेअर बाजाराला दिली आहे. विशेष म्हणजे सोमवारी जेटचे संस्थापक नरेश गोयल यांचे जवळचे मानले जाणारे वरिष्ठ अधिकारी गौरंग शेट्टी यांनीदेखील राजीनामा दिला आहे.

जेट एअरवेज
author img

By

Published : May 14, 2019, 2:31 PM IST

Updated : May 14, 2019, 6:55 PM IST

नवी दिल्ली - जेट कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) अमित अग्रवाल यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबेंनीही राजीनामा दिला आहे. आर्थिक डबघाईस आलेल्या जेट एअरवेज कंपनीतून वरिष्ठ अधिकाऱ्यांची गळती सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे.

वैयक्तीक कारणांमुळे सीईओ विनय दुबेंनी तात्काळ राजीनामा दिल्याचे जेट एअरवेजने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
अमित अग्रवाल यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती जेट एअरवेजने शेअर बाजाराला दिली आहे. विशेष म्हणजे सोमवारी जेटचे संस्थापक नरेश गोयल यांचे जवळचे मानले जाणारे वरिष्ठ अधिकारी गौरंग शेट्टी यांनीदेखील राजीनामा दिला आहे.

जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवनाबाबत सांशकता -
आर्थिक अडचणीत सापडल्याने जेट एअरवेजला १७ एप्रिलपासून विमान उड्डाणे थांबवावी लागली आहेत. यानंतर हजारो कर्मचारी जेट एअरवेज सोडून प्रतिस्पर्धी असलेल्या विविध विमान कंपन्यांत रुजू झाले आहेत. त्यानंतर जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवनाबाबत सांशकता व्यक्त करण्यात येत आहे. जेट एअरवेजकडून थकलेले कर्ज वसूल करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने कंपनीची ८ हजार ४०० कोटींची मालमत्ता विक्रीला काढली आहे. इतिहाद या एकमेव कंपनीने बोलीच्या शेवटच्या दिवशी मालमत्ता खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे.

Intro:Body:

biz

Conclusion:
Last Updated : May 14, 2019, 6:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.