नवी दिल्ली - फेसबुकच्या मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्राईलची कंपनी स्पायवेअरचा वापरत असल्याचे म्हटले आहे. या प्रकाराबाबत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबुकला विचारणा करणारे पत्र लिहिले आहे.
इस्राईलमधील एनएसओ ग्रुपने तंत्रज्ञानाचा वापर करत जगभरातील १ हजार ४०० लोकांच्या स्मार्टफोनला लक्ष्य केल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. यामध्ये राजकीय विरोधक, पत्रकार आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये कोणत्या पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा समावेश हे कंपनीने जाहीर केले नाही.
मे दरम्यान संबंधित पत्रकारांच्या स्मार्टफोनला लक्ष्य करण्याचे इस्त्राईलच्या कंपनीने थांबविले आहे. या कंपनीकडून व्हिडिओ कॉलिंग सिस्टिममधून मालवेअर हा वापरकर्त्याच्या स्मार्टफोनमध्ये सोडण्यात येत होता. व्हॉट्सअॅपने या प्रकाराची जगातील १ हजार ४०० वापरकर्त्यांना माहिती दिली आहे.
हेही वाचा-ट्विटरवरून आता नाही करता येणार राजकीय जाहीराती..
ज्या वापरकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपवर सायबर हल्ला झाला त्यांना याची माहिती देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे
केवळ सरकारी गुप्तचर संस्थेला मालवेअरच्या तंत्रज्ञानाचा परवाना देण्यात असल्याचे एनएसओने म्हटले आहे.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला पत्र लिहून विचारणा केली आहे. व्हॉट्सअॅपने कॅलिफॉर्नियाच्या केंद्रीय न्यायालयात एनएसओ ग्रुपविरोधात दाखल केला आहे. टोरोंटो विद्यापीठामधील सिटीजन लॅबने हॅकिंग प्रकार उघडण्यासाठी व्हॉट्सअॅपला मदत केली आहे.
एनएसओने फेटाळले आरोप-
आमच्या तंत्रज्ञानाचा वापर हा पत्रकार अथवा मानवाधिकार कार्यकर्त्याविरोधात करण्यासाठी तयार करण्यात आला नसल्याचेही एनएसओने म्हटले आहे. तर गुप्तचर आणि अंमलबजावणी संस्थांना दहशतवादी आणि गंभीर गुन्ह्यात मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे एनएसओने म्हटले आहे.
व्हॉट्सअॅपचे जगभरात १.५ अब्ज वापरकर्ते आहेत. यामध्ये भारतामध्ये ४ कोटी वापरकर्ते आहेत.