ETV Bharat / business

इंडिगो चीनसह मलेशियामध्ये सुरू करणार मालवाहू विमान वाहतूक - Cargo service

सूत्राच्या माहितीनुसार इंडिगो हे चीन, सिंगापूर आणि मलेशियामध्ये मालवाहू विमान वाहतूक सुरू करणार आहे. वैद्यकीय साधनांसह इतर जीवनावश्यक वस्तुंसाठी बहुतांश मालवाहू विमान वाहतूक मोफत करण्यात येणार आहे.

इंडिगो
इंडिगो
author img

By

Published : Apr 24, 2020, 3:23 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात टाळेबंदी असताना इंडिगोने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. कंपनीकडून चीनसह मलेशिया व देशांतर्गत मालवाहू विमान वाहतूक सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

सूत्राच्या माहितीनुसार इंडिगो हे चीन, सिंगापूर आणि मलेशियामध्ये मालवाहू विमान वाहतूक सुरू करणार आहे. वैद्यकीय साधनांसह इतर जीवनावश्यक वस्तुंसाठी बहुतांश मालवाहू विमान वाहतूक मोफत करण्यात येणार आहे. विमान कंपनीचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर विल्यम बाउल्टर म्हणाले, की प्रवासी विमान वाहतूक बंद झाली आहे. अशावेळी मालवाहू विमान वाहतूक आमच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आम्ही देशासह विदेशात वैद्यकीय साधनांची मालवाहतूक केली आहे.

हेही वाचा-अभूतपूर्व : 'फ्रँकलिन टेम्पलेटन'ने सहा म्युच्युअल फंडच्या गुंतवणूक योजना केल्या बंद

बुधाबीसह मस्कतमध्ये भारतामधून पालेभाज्या मालवाहू विमानाने नेण्यात आल्या होत्या. मलेशिया, चीन आणि सिंगापूरमध्ये मालवाहू विमान वाहतूक करणे आमच्या रडारवर आहे. देशामध्येही मालवाहू विमान वाहतूक वाढविण्यात येणार आहे. इंडिगोचे देशात मोठे नेटवर्क आहे. तसेच कंपनीकडे देशात सर्वाधिक विमान आहेत.

हेही वाचा-देशातील विमान कंपन्यांना ८५,२१० कोटींचे नुकसान; २९ लाख नोकऱ्या धोक्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.