नवी दिल्ली – टाळेबंदीत अनेकजणांनी घरातील अन्नालाच पसंती दिली आहे, हा समज खोटा ठरविणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात टाळेबंदी असताना चिकन बिर्याणीच्या साडेपाच लाख ऑर्डर करण्यात आल्याचे स्विग्गी या ऑनलाईन फूड कंपनीने म्हटले आहे.
लोकांना टाळेबंदीत बिर्याणीचा पर्याय सोयीस्कर वाटला आहे. सुमारे 5.5 लाख बिर्याणीच्या ऑर्डर ग्राहकांनी केल्या होत्या, असे स्विग्गी कंपनीने म्हटले आहे. स्विग्गीने 323 दशलक्ष किलो कांदे आणि 56 दशलक्ष किलो केळी ग्राहकांना घरपोहोच दिले आहेत. स्विग्गीकडून रोज रात्री आठ वाजेपर्यंत 65 हजार जेवणाच्या ऑर्डर ग्राहकापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्राहकाला रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत ऑर्डर पोहोचली जाईल, याची काळजी घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
- ग्राहकांनी गेल्या काही महिन्यांत सर्वाधिक चोको लावा केकच्या 1 लाख 29 हजार ऑर्डर केल्या आहेत. त्यानंतर गुलाब जामून आणि बटरस्कॉच केकला ग्राहकांनी घरी मागविण्यासाठी पसंती दिली आहे.
- टाळेबंदीत ग्राहकांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी सुमारे 1 लाख 20 हजार केक घरी मागविले आहेत.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी स्विग्गीमधून 73 हजार सॅनिटायझर आणि हँडवाश खरेदी केल्या आहेत. तर 47 हजार मास्कची स्विग्गीमधून खरेदी केली आहे.
- महाविद्यालयीन जीवनापासून अनेक ग्राहक हे नूडल्स खातात. टाळेबंदीत साडेतीन लाख नुडल्सचे पॅकेट स्विग्गीमधून मागविण्यात आले आहेत.
स्विग्गीने गरजुंसाठी होप, नॉट हंगर ही मोहिम राबविण्यासाठी 10 कोटींचा निधी जमविला. त्यामधून 30 लाख जेवण गरजुंना टाळेबंदी देण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली. दरम्यान, टाळेबंदीत हॉटेल बंद राहिल्याने ग्राहकांना ऑनलाईन फूड मागविण्याचा पर्याय उपलब्ध होता.