नवी दिल्ली - सरकारी बँकांचे कर्ज बुडवून परदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्याला आयडीबीआयने 'कर्ज बुडवा' म्हणून आज जाहीर केले. याबाबत बँकेने मल्ल्याच्या जुन्या पासपोर्ट आकारातील फोटोसह जाहीर नोटीस काढली आहे. मल्ल्याने किंगफिशरशी संबंधित १ हजार ५६६ कोटी रुपये थकविले आहेत.
किंगफिशरचा संचालक असताना विजय मल्ल्याने आयडीबीआयकडून कर्ज घेतले आहे. त्याने स्वत: कर्ज फेडण्याची हमीही जामीनदार म्हणून बँकेला दिली होती. आयडीबीआय बँकेच्या मुंबईतील एनपीए व्यवस्थापनाने मल्ल्याची कर्जबुडवा म्हणून नोटीस काढली आहे. यामध्ये मल्ल्याचा कृष्णधवल फोटो आहे. तर त्याचा बंगळुरूमधील यूबी टॉवरचा नोटीसमध्ये पत्ता दिलेला आहे.
हेही वाचा-शेअर बाजाराचा नवा विक्रम; निर्देशांक वधारून पोहोचला ४०,४६९.७८ व
मल्ल्या हा लंडनमध्ये आहे. त्याचे प्रत्यर्पण करण्यासाठी भारत सरकारने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. कर्जदार विजय मल्ल्याच्या मालमत्तेसंदर्भात कोणीही व्यवहार करू नये, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. त्याच्याकडे थकलेले प्रचंड कर्ज वसूल करायचे आहे. कर्जदार आणि जामीनदार हे कर्जाचे व्याज आणि हप्ते फेडण्यात अपयशी ठरल्याचे आयडीबीआयने नोटीसमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-बीएसएनएलची स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर; जाणून घ्या, किती मिळणार कर्मचाऱ्यांना पैसे
आयडीबीआयचे किंगफिशरकडे व्याजासह एकूण एकूण १५६६.६१ कोटी रुपये कर्ज थकीत आहे. विजय मल्ल्याने किंगफिशर एअरलाईन्सच्या ब्रँडची हमी, वैयक्तिक हमी, युनायटेड ब्रेवरिज होल्डिंगची कॉर्पोरेट हमी व मुंबईमधील किंगफिशर हाऊस इत्यादी मालमत्ता आयडीबीआयकडे गहाण म्हणून ठेवली आहे.