मुंबई - येस बँकेवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक यांनी पुढाकार घेतला आहे. येस बँकेत १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. तर कोटक महिंद्रा बँकेने येस बँकेत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.
एचडीएफसी बँक येस बँकेचे १००० कोटी रुपयांचे शेअर प्रति १० रुपयांनी विकत घेणार आहे. ही गुंतवणुकीची प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण होणार असल्याचे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे. कोटक महिंद्राही ५०० कोटी रुपयांचे येस बँकेचे शेअर खरेदी करणार आहे.
हेही वाचा-घाबरू नका, शेअर बाजार पुन्हा वधारेल - गुंतवणूकतज्ज्ञांचा सल्ला
यापूर्वीच आयसीआयसीआय बँकने येस बँकेत १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर अॅक्सिस बँकेने येस बँकेत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले आहे. स्टेट बँकेच्या संचालक मंडळाने येस बँकेचे ७ हजार २५० कोटी रुपयांचे शेअर खरेदी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.
हेही वाचा-येस बँकेच्या फेररचना आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी