ETV Bharat / business

वाहनांवरील कर कपातीचा अंतिम निर्णय जीएसटी परिषद घेणार - निर्मला सीतारामन - GST rate

बीएस-४ आणि इतर विषयाबाबत मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. जीएसटी परिषदेची २० सप्टेंबरला गोव्यामध्ये बैठक होणार आहे.

संग्रहित - निर्मला सीतारामन
author img

By

Published : Sep 2, 2019, 12:35 PM IST

चेन्नई - मंदीची समस्या भेडसावत असल्याने जीएसटी कपात करण्याची वाहन उद्योगामधून मागणी होत आहे. यावर बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहनांवरील कर कपातीचा अंतिम निर्णय जीएसटी परिषद घेणार असल्याचे म्हटले आहे.

बीएस-४ आणि इतर विषयाबाबत मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. जीएसटी परिषदेची २० सप्टेंबरला गोव्यामध्ये बैठक होणार आहे.

हेही वाचा-बँकांच्या विलिनीकरणानंतर एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही

वाहन उद्योगाच्या समस्या विविध कारणामुळे असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. यामध्ये बीएस-४ वाहनांचे बीएस -६ मध्ये संक्रमण करण्याचा नियम व खरेदी करण्याचा ग्राहकांकडून पुढे निर्णय ढकलणे अशी कारणे आहेत.

हेही वाचा-काही मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या इच्छेपुढे सरकारने झुकू नये - सीएआयटी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २१ ऑगस्टला ३२ सुधारणांची घोषणा केली. यामध्ये बीएस-४ वाहनांची खरेदी ३१ मार्च २०२० पर्यंत खरेदी करणे अशा निर्णयांचा समावेश आहे.

हेही वाचा-जीएसटीला ओहोटी! ऑगस्टमध्ये १ लाख कोटींहून कमी कर संकलन

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.