नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रासिम इंडस्ट्रीजकडून ५ हजार ८७२.१३ कोटी कराची मागणी केली आहे. हा कर आदित्य बिर्ला नुवो आणि आदित्य बिर्ला फायनान्शियल सर्व्हिसेसच्या विलिनीकरावर लावण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.
प्राप्तिकर विभागाच्या आयुक्तांनी नियमाप्रमाणे दोन्ही कंपन्यांचे विलिनीकरण झाले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ग्रासिम इंडस्ट्रीजला देण्यात आलेले शेअर्स हा लाभांश म्हणून प्राप्तिकर विभागाने गृहीत धरला आहे. तर नियमाप्रमाणेच दोन्ही कंपन्यांचे विलिनीकरण झाल्याचा दावा ग्रासिम कंपनीने केला आहे. प्राप्तीकराच्या आदेशावर योग्य ते कार्यवाही केली जाईल, असेही ग्रासिम इंडस्ट्रीजने म्हटले आहे.सप्टेंबर २०१७ मध्ये अहमदाबादमधील एनसीएलटीने आदित्य बिर्ला नुवो (एबीएनएल) आणि ग्रासिम इंडस्ट्रीजच्या एबीएफएसलच्या विलिनीकरणाला मान्यता दिली आहे.