ETV Bharat / business

गुगल आणणार स्मार्ट डेबिट कार्ड; 'या' असणार सुविधा - गुगल प्ले स्टोअर

कार्डवरून करण्यात येणाऱ्या खरेदीसाठी गुगल शुल्क आकारण्याची शक्यता आहे.

गुगल स्मार्ट डेबिट कार्ड
गुगल स्मार्ट डेबिट कार्ड
author img

By

Published : Apr 18, 2020, 3:18 PM IST

नवी दिल्ली -अॅपल क्रेडिट कार्डच्या यशानंतर गुगलही भौतिक (फिजिकल) आणि आभासी स्मार्ट डेबिट कार्ड आणणार आहे. या स्मार्ट कार्डने ग्राहकांना ऑनलाईन व किरकोळ विक्री केंद्रामधून खरेदी करता येणार आहे.

गुगलकडून स्मार्ट डेबिट कार्ड हे गुगल अॅपला जोडण्यावर काम सुरू असल्याचे एका टेकविषयीच्या वेबसाईटने म्हटले आहे.

हेही वाचा-'कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरता नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करा'

  • गुगल अॅप हे स्मार्ट कार्डला जोडल्यानंतर ग्राहकाला खरेदी, जमा रक्कम याची माहिती मिळू शकणार आहे.
  • स्मार्ट कार्डची सिटी आणि स्टॅनफोर्ड फेडरल क्रेडिट युनियनसह विविध बँकांशी भागीदारी करण्यात येणार आहे.
  • सध्या, गुगल पे हे विविध बँकांच्या डेबिट कार्डशी संलग्न केल्यानंतर सेवा देण्यात येते.
  • कार्डवरून करण्यात येणाऱ्या खरेदीसाठी गुगल शुल्क आकारण्याची शक्यता आहे.

सुट्ट्यांच्या काळातही अॅपल आयफोनची विक्री होण्यामागे अॅपल कार्ड असल्याचे कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी म्हटले होते.

हेही वाचा-फ्लिपकार्टसह वॉलमार्ट कोरोनाच्या लढ्याकरता करणार ४६ कोटींची मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.