नवी दिल्ली - गुगलच्या बंगळुरूमधील कर्मचाऱ्याला कोरोनाची (कोविड-१९) लागण झाली आहे. त्यामुळे कंपनीने बंगळुरूमधील कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचे (वर्क फ्रॉम होम) आदेश दिले आहेत. कोरोना या संसर्गजन्य रोगाची लागण होवू नये, यासाठी हा निर्णय गुगलने घेतला आहे.
गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले, की कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहोत. प्रत्येकाचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत आहोत.
हेही वाचा-पंजाब बँक घोटाळा - माजी संचालकांसह २ व्हॅल्युअरला मुंबई पोलिसांकडून अटक
गुगलचे बंगळुरूमधील कार्यालय देशातील सर्वात जुने आहे. या कार्यालयात हजारो अभियंते काम करत आहेत. नुकतेच माईंडट्री आणि डेलमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. जगभरातील ११६ देशांमध्ये १ लाख ३० हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर किमान ४,९०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशामध्ये कोरोनाची ७५ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा-किरकोळ बाजारातील महागाईत घसरण; फेब्रुवारीत ६.५८ टक्क्यांची नोंद