ETV Bharat / business

गुगलच्या ब्रेकनंतरही रेल्वे स्थानकांवरील वायफाय राहणार 'सुस्साट' - WiFi connectivity

भारतीय रेल्वे आणि रेलटेल कॉर्पोरेशनबरोबर गुगलने २०१५ ला भागीदारी केली आहे. यामधून रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय देण्याची सुविधा देण्यात येते. हे कंत्राट मे २०२० ला संपणार आहे.

Google Free WiFi  service
गुगल वायफाय सुविधा
author img

By

Published : Feb 18, 2020, 12:03 PM IST

नवी दिल्ली - गुगलने देशातील सुमारे ४१५ रेल्वे स्थानकांवरील मोफत वायफायची सुविधा बंद करूनही रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे स्थानकावरील मोफत वायफायची सुविधा सुरू राहणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

भारतीय रेल्वे आणि रेलटेल कॉर्पोरेशनबरोबर गुगलने २०१५ ला भागीदारी केली आहे. यामधून रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय देण्याची सुविधा देण्यात येते. हे कंत्राट मे २०२० ला संपणार आहे. रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय देण्यासाठीचे गुगलबरोबरील हे कंत्राटाचे हे पाचवे वर्ष आहे. हा करार मे २०२० ला संपणार असल्याचे रेलटेल या मिनीरत्न सार्वजनिक कंपनीने म्हटले आहे. असे असले तरी, रेलटेलकडून पूर्वीचीच नेटवर्कची गुणवत्ता, वेग असलेली वायफायची सुविधा अंखडितपणे देण्यात येणार आहे. गुगलने या प्रवासात सहकार्य दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभारी आहोत, असेही रेलटेलने म्हटले आहे.

संबंधित बातमी वाचा-रेल्वे स्टेशनवरील गुगलची मोफत वायफायची सेवा होणार बंद, कारण....

रेल्वे स्टेशन ही डिजिटल समावेशकतेचे माध्यम म्हणून पुढेही कार्यरत राहणार आहे. रेलटेलकडून देशातील ५,६०० अधिक रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय देण्यात येणार आहे. त्यामध्ये गुगलकडून तांत्रिक सहाय्य देण्यात येणाऱ्या ४१५ स्थानकांचा समावेश आहे. प्रवाशांना वायफायची सुविधा घेताना कोणताही अडथळा येणार नाही, असे रेलटेलने म्हटले आहे.

हेही वाचा-साखर कारखान्यांसाठी 'सुगीचा हंगाम', चढे दर असताना निर्यातीची संधी

गुगलने ही सोमवारी केली होती घोषणा-

रेल्वे स्थानकावर देण्यात येणारी मोफत वायफायची सुविधा बंद करणार असल्याची घोषणा आज गुगलने केली आहे. ही सेवा देशामधील ४०० हून अधिक स्थानकावरून हळूहळू बंद करण्यात येणार आहे. गुगलच्या दाव्यानुसार मोबाईल डाटाचे प्लॅन परवडणाऱ्या दरात राहण्यासाठी वायफाय बंद करण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.