बंगळुरू - फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांच्यावर पत्नी प्रिया यांनी हु़ंड्यासाठी छळ केल्याची पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी बन्सल यांच्या नातेवाईकांविरोधात कोरोमंगला पोलीस स्टेशनमध्येही तक्रार देण्यात आली आहे.
पती सचिन बन्सल यांच्यापासून मुलगा आर्यन आणि स्वत:ला शारीरीक, मानसिक आणि भावनिक धोका होता, असे प्रिया बन्सल यांनी तक्रारीत म्हटले आहे. बन्सल यांनी सर्व मालमत्ता त्यांच्या नावावर करण्यासाठी छळ केल्याचे प्रिया यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा-यंदा खासगी कंपन्यांमध्ये किती होणार वेतनवाढ; जाणून घ्या सर्व्हेमधील माहिती
प्रिया बन्सल यांनी तक्रार दिली आहे, या वृत्ताला कारी बसवगोंडाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. तपास सुरू असून बन्सल यांना अटक करण्यात आले नसल्याचेही सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितले.